Headlines

आंदोलकांचा रस्त्यातच ठिय्या:आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पावसातच मोर्चा




अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मंगळवारी पावसातच मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील मार्गातच काही युवकांनी ठिय्या देत मागण्यांसाठी आग्रह धरत आगामी काळात आंदोलन तीव्र होण्याचे संकेत दिले. स्वराज्य भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे आयोजन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीतर्फे परिमल कांबळे, रामदास तायडे, ललित अंभोरे, प्रकाश तायडे, संजय धनाडे, उमेश लखन, बाळकृष्ण गायकवाड, अमर इंगळे, संतोष चव्हाण यांनी केले. मोर्चात विष्णू कसबे, सचिन साठे, कैलास खंडारे, वामनराव भिसे, मोहनराव अंजनकर, पराग कांबळे, बाळासाहेब तायडे, योगेश सोनोने आदी सहभागी झाले होते. अन्य राज्यांत झाली अंमलबजावणी उपवर्गीकरणबाबताच निर्णय ऑगस्ट २०२४ मध्येच कोर्टाने दिल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अंमलबजावणी झाली व अनुसूचित जातीच्या आरक्षणाची उपवर्गीकरण झाले. महाराष्ट्र सरकारनेही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे. उपवर्गीकरण हे संविधानिक दृष्टीने योग्य आहे. उपवर्गीकरणाला विरोध हा नैतिकतेला अनुसरून नाही, असेही समर्थकांचे म्हणणे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *