![]()
अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टच्या वतीने शहरात तीन दिवसीय ड्राय नीडलिंग कार्यशाळा संपन्न झाली. भौतिकोपचार विश्वातील ही आधुनिक पद्धतीचे सर्व फिजिओथेरपिस्ट वर्गाला आकलन व्हावे यासाठी हा उपक्रम साकार करण्यात आला. रायझिंग सन सभागृहात संपन्न यात आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त “प्रमाणपत्र कोर्स ड्राय नीडलिंगच्या संदर्भात’ आयोजित करण्यात आला. या कार्यशाळेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने फिजिओथेरपिस्ट सहभागी झाले. कार्यशाळेत बंगळुरू येथील ड्राय नीडलिंग तज्ज्ञ डॉ. शुभंजन दास मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी ड्राय नीडलिंग तंत्राचे वैज्ञानिक तत्त्व, आधुनिक उपचार पद्धती, सुरक्षित वापर तसेच प्रत्यक्ष हँड्स-ऑन प्रशिक्षण देत सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेत स्नायू व अस्थिसांध्यांच्या विविध विकारांवरील ड्राय नीडलिंगच्या प्रभावी उपचारपद्धतींची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत सहभागी फिजिओथेरपिस्टना ० आधुनिक ड्राय नीडलिंग तंत्रज्ञान त्याचा सुरक्षित व परिणाम कारक वापर, क्लिनिकल अनुप्रयोग तसेच रुग्ण उपचारातील व्यावहारिक कौशल्ये यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे सहभागींच्या व्यावसायिक ज्ञानात व कौशल्यात निश्चितच भर पडल्याची भावना सहभागी फिजिओथेरपिस्टनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्ष डॉ. दर्शन लढ्ढा यांच्या हस्ते डॉ. शुभंजन दास यांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनच्या वतीने भविष्यातही फिजिओथेरपिस्टच्या ज्ञानवृद्धी व कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वक्ता परिचय व सूत्रसंचालन डॉ. शिरीन देशमुख यांनी केली. कार्यशाळेच्या सफलतेसाठी सचिव डॉ. प्रणव पाथरकर, सहसचिव डॉ. दुर्गा लढ्ढा, खजिनदार डॉ. विद्याधर वणवे, जनसंपर्क प्रमुख डॉ. मेघना गांधी आदींचे सहकार्य लाभले.
Source link
फिजिओथेरपिस्टची ड्राय नीडलिंग कार्यशाळा:बंगळुरूचे प्रख्यात तज्ज्ञ डॉ. शुभंजन दास यांच्यासहविविध तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन