Headlines

तीस दिंड्या अन् हजारो वारकऱ्यांसह ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सुरुवात:नेवाशातून पालखी सोहळा मार्गस्थ, नेवासेत पहिला रिंगण सोहळा‎



संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे बुधवारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालख

.

दिंडीचे नेतृत्व ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. रामभाऊ राऊत आणि राम महाराज झिंजुरके यांनी केले. प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन भास्करगिरीजी महाराज, उद्धवजी महाराज यांच्यासह उपस्थित संतांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात करण्यात आले.

मंदिरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाल्यानंतर, रथाचे मानाचे बैल व अश्वाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, रत्नमालाताई लंघे-पाटील, देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिवसेनेचे युवा नेते प्रभाकरराव शिंदे, उदयनदादा गडाख-पाटील, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते पालखी रथातील पादुकांचे पूजन करण्यात आले. नेवासा एसटी स्थानक परिसरात राज्यातील दुसरा आणि या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा भक्तिभावात पार पडला. अश्व रिंगण, झेंडा रिंगण, टाळ-मृदंग रिंगण तसेच महिला भजनी मंडळांचे रिंगण माऊलींच्या जयघोषात रंगले. नेवासा आगाराच्या वतीने आगार व्यवस्थापक प्रशांत होले व कर्मचाऱ्यांनी पालखीचे पूजन केले. तसेच नेवासा प्रेस क्लब व पत्रकारांच्या वतीनेही पालखीचे भव्य स्वागत करून देविदासजी म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी हजारो वारकरी, महिला-पुरुष भाविक आणि नेवासेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिंडीची नेवासे शहराला प्रदक्षिणा दिंडीच्या अग्रभागी भागवत धर्माची पताका, डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला, भजनी मंडळे आणि पुष्पांनी सजविलेल्या चांदीच्या रथात माऊलींच्या पादुका असे स्वरूप होते. दिंडीने नेवासे शहराला प्रदक्षिणा घातली. शहरातील विविध चौकांत फटाक्यांची आतषबाजी, तोफांची सलामी, रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी करून पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. नगरपंचायत चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, तर महाराष्ट्र बँक चौकात मुथा कुटुंबाकडून फराळाचे वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *