Headlines

27 हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी:11,500 चष्मे वाटप, श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत वारकऱ्यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे झालेल्या या शिबिरात २७ हजार ५६४ हून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच, ११ हजार ५०० भाविकांना चष्मे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरात डोळ्यांची तपासणी, अंगदुखी, डोकेदुखी, रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) यांसारख्या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्यांवर विनामूल्य औषधे देण्यात आली. तसेच, अंगदुखी आणि पाठदुखीसाठी ॲक्युप्रेशर थेरपी व प्रथमोपचारही करण्यात आले. ज्या वारकऱ्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे. या शिबिरात डॉक्टर आणि स्वयंसेवक मिळून २७५ जणांनी सहभाग घेतला. या शिबिराच्या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ सूर्यवंशी, रुणाल केसरकर, प्रदीप ढवळे, मनोज वाळुंजकर, सुनील जाधव, विजय कोंढाळकर, ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी आणि सुवर्णयुग तरुण मंडळ व सुवर्णयुग सहकारी बँकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिर परिसरात तब्बल २५ हजार वारकऱ्यांना सकाळचा नाश्ता व चहा देखील देण्यात आला. या शिबिरात सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन, तेजोमयी आय केअर, रेणुका नेत्रालय, सूर्य सह्याद्री हॉस्पिटल कसबा पेठ, सद्गुरु शंकर महाराज मठ अन्नछत्र समिती, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, देशपाडे आय केअर कोथरूड यांसारख्या विविध संस्थांनी सहभाग घेतला. ट्रस्टतर्फे यापुढेही विविध मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुण्यामध्ये पालख्यांचे आगमन होताना मंदिरासमोर पालख्यांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *