Headlines

“आम्ही झालो, आता शेणित गावातील पुढील पिढी अधिकारी बनवणारच’:गावच्या सुपुत्रांनी सुरू केला शिक्षणाचा महायज्ञ, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप‎



क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ऐतिहासिक संघर्षाची साक्ष देणारे आणि तालुक्यात ‘अधिकारी व शिक्षकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेणित (ता. अकोले) गावात एक अनोखी कृतज्ञता पाहायला मिळाली. आपल्या उत्पन्नावर आपल्या मातीचा अधिकार आहे,याच भावनेतून गावाती

.

या चळवळीचा पहिला टप्पा म्हणून नुकतेच जि. प. शाळा डामसेवाडी, शेणित (गावठाण), ठोकळवाडी आणि राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये उत्तम दर्जाच्या वह्या, पेन, चित्रकला वह्या, स्कॉलरशिप व एनएमएमएस गाईड्ससह शालेय गणवेशांचा समावेश होता. केवळ साहित्य वाटपच नाही, तर गुणवत्तेवर भर देण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत ४ थी व ७ वीच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी बाहेरील तज्ज्ञ मार्गदर्शक आणण्यात येणार असून, याचा खर्च नागेश धोंगे करणार आहेत. तसेच, ८ वीच्या एनएमएमएस परीक्षेच्या मार्गदर्शनाचा सर्व खर्च मारुती लांघी यांनी उचलला आहे. परीक्षांमध्ये चमकणाऱ्या गुणवंतांना गावातील कर्मचारी वर्गाकडून बक्षीसे दिली जाणार आहेत.

नागपूर जि. प. चे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, डॉ. दीपक डामसे, राजाराम ठोकळ, प्रा. सीताराम धोंगडे यांसह अनेक संवेदनशील कर्मचाऱ्यांच्या कल्पनेतून ही चळवळ उभी राहिली आहे. या कार्यक्रमास सरपंच गोविंद करवंदे, रमेश आव्हाड, गणपत लांघी, अरुण पवार आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *