Headlines

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आठ जणांचा शोध अद्याप सुरू; मुख्यमंत्री फडणवीसांचे तातडीचे निर्देश, बचावकार्याला गती




मोशी येथील कचरा डेपोत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला आता ६५ तासांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही ढिगाऱ्याखाली दबलेल्या ८ बेपत्ता कामगारांचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. या कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि महापालिका प्रशासनाकडून रात्रंदिवस युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेचा पुण्यामध्ये सविस्तर आढावा घेत, मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि कचरा प्रक्रियेची प्रभावी व्यवस्था उभारण्याचे कडक निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पहिल्या मजल्याखाली ८ कामगार अडकल्याची भीती बुधवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेनंतर बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अत्याधुनिक कटरच्या साहाय्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात यश आले असून, आता पहिल्या मजल्याचा स्लॅब फोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बेपत्ता असलेले आठही कामगार याच स्लॅबखाली अडकले असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अत्याधुनिक ‘डिमोलीशन एक्सकॅव्हेटर’ घटनास्थळी दाखल इमारतीचा अस्थिर झालेला काँक्रिटचा भाग फोडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याकरिता ‘डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन’ घटनास्थळी आणण्यात आले आहे. या मशीनमुळे मोहिमेला वेग आला असून, आज रात्रीपर्यंत हे शोधकार्य पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. देवेंद्र फडणवीसांकडून आढावा अन् प्रशासनाला निर्देश एकाचा मृत्यू, ८ जण अजूनही बेपत्ता बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीचा पाया खचला आणि कचऱ्याचा मोठा डोंगर पुरासारखा इमारतीत घुसला. यात २३ कर्मचारी अडकले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ८ जण अजूनही बेपत्ता आहेत. या संपूर्ण प्रकरणात झालेला निष्काळजीपणा उघड दिसत असून, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. हेही वाचा.. मोशी दुर्घटना, 56 तासांनंतरही कचऱ्यात दबलेल्यांचा थांगपत्ता नाही:45 मीटर उंच कचऱ्याच्या डोंगराजवळ इमारत बांधल्यानेच 8 जीव धोक्यात
पिंपरी-चिंचवड येथील मोशी डेपोत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली बुधवारी दुपारी दीड वाजता दबलेल्या ८ जणांचा शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत थांगपत्ता लागला नाही. एकूण परिस्थिती पाहता आठही जणांचा जीव धोक्यात आहे. येथे सुमारे ४५ मीटर उंच कचऱ्याच्या डोंगराजवळ नियम मोडून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत बांधल्यानेच हे आठ जीव धोक्यात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी केली जाईल, असे मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *