![]()
महाराष्ट्राच्या घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांत पुजल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती प्रत्यक्षात गुजरातच्या मातीतून घडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे वाहतूक खर्च दुप्पट झाल्याने यंदा मूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची मोठी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने जाहीर केलेला ७०० ब्रास मोफत मातीचा शासन निर्णय उशिरा निघाल्यामुळे या वर्षी त्याचा मूर्तिकारांना काडीचाही फायदा झालेला नाही. म्हणूनच “केंद्र व राज्य शासनाने आता थेट गुजरात सरकारशी “टायअप’ करून नेहमीकरिता आंतरराज्य वाहतूक दरात सवलत मिळवून द्यावी,’ अशी आग्रही मागणी पेण येथील मूर्तिकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सदस्य विनोद मुनेकर यांनी केली आहे. पेणमधील सुमारे दीड हजार कारखान्यांमध्ये वर्षभर काम चालते. कोकणासह महाराष्ट्रातील ३५ लाख मूर्तिकारांची भिस्त स्थानिक मातीवर नसून गुजरातच्या अंकलेश्वर, जगाडिया, पालेज, भावनगर आणि भुज येथून येणाऱ्या “बेंटोनाइट’ मातीवर आहे. एका मोठ्या कारखान्याला वर्षाला ९० टन माती लागते आणि एकट्या पेणमध्ये दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकले असून भारतात डिझेलचे भाव कडाडले आहेत. यामुळे गुजरातहून येणाऱ्या मातीचा वाहतूक खर्च ५० हजारांवरून थेट ६५ हजारांवर गेला आहे. जीआरची वेळ चुकली शासनाचा ७०० ब्रास मोफत मातीचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी त्याची वेळ चुकल्याने यंदा मूर्तिकारांना लाभ घेता आलेला नाही. “महाखनिज’ पोर्टल अजून सुरू झालेले नाही, तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे शुल्क किती आणि खासगी जमिनीचे मोबदले कसे द्यायचे, यावर संभ्रम आहे. – सुरेश पाठक, प्रदेश अध्यक्ष, पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकले असून भारतात डिझेलचे भाव कडाडले आहेत. यामुळे गुजरातहून येणाऱ्या मातीचा वाहतूक खर्च ५० हजारांवरून थेट ६५ हजारांवर गेला आहे. ८० कोटींची उलाढाल शक्य पेण, मुंबई, पुणे आणि नागपूरच्या मूर्तिकार केंद्रांमध्ये गणेशोत्सवाच्या ३-४ महिने आधी गुजरात ते महाराष्ट्रदरम्यान या विशिष्ट मातीची सुमारे ५० ते ८० कोटींची उलाढाल होते. भावनगरची “शाडू’ आणि कच्छची “चायना क्ले’ मूर्तीला फिनिशिंग देतात. ही नैसर्गिक गाळाची माती असून ती पाण्यात ४-५ तासांत पूर्ण विरघळते, म्हणूनच मूर्तिकार या मातीला पसंती देतात.
Source link
यंदा गणेशमूर्ती 30 टक्केमहाग मिळण्याची शक्यता:गुजरात राज्यातील ‘माती’मधून घडतात महाराष्ट्राचे गणपती, ‘टायअप’ची मागणी