![]()
मोहोळ पंचायत समिती आरोग्य विभागाकडून आषाढीवारी निमित्त शेटफळ, आष्टी, कामती, वाघोली व घोडेश्वर अशा पाच ठिकाणी दि. १९ ते २१ पर्यंत अशा तीन दिवसांसाठी एकूण २६४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी तैनात करून पाणी शुद्धीकरणासह औषध उपचार केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मोहोळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र अनगर, कामती व घोडेश्वर अशा तीन ठिकाणांवरील रुग्णवाहिका सदर ठिकाणी तैनात करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर रुग्ण मिडीयम असेल तर शेटफळ व मोहोळ येथे ॲडमिट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर सिरीयस असल्यास सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातून गजानन महाराजांच्या पालखीसह मुक्ताईनगर येथून मुक्ताईची पालखी येथे दिनांक २१ रोजी अशा महत्त्वाच्या दोन पालख्या येत आहेत. पंचायत समिती मोहोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर व पंचायत समिती मोहोळ आरोग्य सहाय्यक एन. डी. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोहोळ तालुक्यातील पाणी भरण्याची ठिकाणे वाघोली सुतमिल आणि शेटफळ ग्रामपंचायत बोअर ही राहतील. तसेच औषध उपचार केंद्र शेटफळ चौक, आष्टी उपकेंद्र, कामती खुर्द उपकेंद्र, कामती बुद्रुक, जिल्हा परिषद शाळा वाघोली व पेट्रोल पंप बेगमपूर सदर ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहेत. तर कचरा स्वीकृती केंद्र घोडेश्वर, अनगर, आष्टी आणि कामती बुद्रुक अशा चार ठिकाणी करण्यात येणार आहेत. ^वारी काळामध्ये ज्यादा मनुष्यबळासह, पाणी स्त्रोत माहिती, टँकर भरण्याची ठिकाणे, उपचार केंद्र माहिती, रुग्णवाहिका माहिती, आरोग्य दूत कंटेनर, सर्वेक्षण आपत्ती व्यवस्थापन, जैविक कचरा स्वीकृती केंद्र, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, मेडिकल स्टोअर, हॉटेल व्यावसायिक गरज पडल्यास सदर व्यवसाय धारकाकडून मदत घेण्यात येणार आहे. – एन. डी. थोरात, आरोग्य सहाय्यक, पंचायत समिती मोहोळ प्रतिनिधी | नातेपुते/ अकलूज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सोलापूरच्या आरोग्य विभागाने माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर वारकऱ्यांना तत्पर व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावरील मुक्कामस्थळे आणि प्रमुख ठिकाणी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आली असून शासकीय व खासगी मिळून ८० वैद्यकीय संस्था कार्यरत राहणार आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान नातेपुते, माळशिरस आणि वेळापूर या मुक्कामाच्या ठिकाणी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एकूण ३७९ खाटांची सुविधा उपलब्ध असून शाळा व समाजमंदिरांमध्ये ५६ विविधीकृत कक्ष उभारण्यात आले आहेत. तसेच जर्मन हँगरमध्ये ५ वैद्यकीय मदत पथके व ५ फूट मसाज सेवा पथके कार्यरत राहतील. ९७५ दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले असून १७० हॉटेलांवर अन्नसुरक्षा व स्वच्छतेसाठी निरीक्षण पथके कार्यरत राहणार आहेत. पालखी सोहळ्याचे प्रभावी नियोजन आणि समन्वयासाठी आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहेत. या संपूर्ण व्यवस्थेसाठी सुमारे ५७५ अधिकारी व कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. . विशेष पथके: वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी १२ आयसीयू पथके आणि १२ एचबीटी (तात्पुरता आपला दवाखाना) केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक आयसीयू पथकात फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, व्हेंटिलेटर आणि मॉनिटरची सुविधा उपलब्ध असेल. . आरोग्यदूत: याशिवाय ‘आरोग्यदूत’ म्हणून २३ दुचाकीस्वार फिरती वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असून प्रत्येक पथक किमान १० दिंड्यांच्या संपर्कात राहून आरोग्य सेवा पुरवेल. . रुग्णवाहिका: आपत्कालीन सेवांसाठी १०२ क्रमांकाच्या १३ आणि १०८ क्रमांकाच्या ४ अशा एकूण १७ रुग्णवाहिका पालखी मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ४१८ पाणी शुद्धीकरण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ३२ फिलिंग पॉईंट्स निश्चित करण्यात आले असून ५४० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण, पाणी नमुना तपासणी, पाणी स्त्रोतांचे व टँकर्सचे शुद्धीकरण, कंटेनर सर्व्हे, अबेटिंग करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी १८ विशेष स्तनपान कक्ष उभारण्यात आले असल्याचे जानकर यांनी सांगितले. गजानन महाराजांची पालखी मुक्काम हिंगोली तरडगाव येथे होत आहे, तर मुक्ताईच्या पालखीचा मुक्काम आष्टी येथे होणार आहे. सदर रूटवरून अनेक पालख्यांसह पायी वारकरी जात असल्याने सदर ठिकाणी वारी कालावधीमध्ये २४ तास आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून प्राथमिक उपचाराचे नियोजन करण्यात आले आहे.
Source link
पालखी सोहळ्यासाठी 24 तास वैद्यकीय सेवा:379 खाटांची सोय, 12 आयसीयू पथके अन् 23 दुचाकी आरोग्यदूत वारकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात