Headlines

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी पत्रके, बॅनर जप्त‎:मार्क्सवादाच्या नावावर काॅ. अशोकचे पत्रक; विविध कंपन्यांसह ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत दिली धमकी‎




गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली‎बुर्गी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‎कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी ‎कॉम्रेड अशोकच्या नावाची पत्रके आणि‎ एक बॅनर आढळून आले असून, यात‎ नागरिकांनी विविध कंपन्या आणि ड्रोन‎ सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करावा,‎अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,‎अशी चेतावणी देण्यात आली आहे. या‎ घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र ‎नक्षलवादी चळवळ सक्रिय होत‎ असल्याची चर्चा सुरू झाली असून,‎पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या‎ आहेत.‎ स्वतःला मार्क्सवादी कम्युनिस्ट‎ पक्षाशी संबंधित कॉम्रेड अशोक‎ असल्याचा उल्लेख करणाऱ्या या‎ पत्रकांमध्ये ओमसाई, नॅचरल कंपनी, ‎सनफ्लॅग, जेएसडब्ल्यू प्रकल्प तातडीने ‎बंद करण्याची आणि हेड कसा–कु‎री–मोहरली व खेमरागडी–पिपली बुर्गी ‎परिसरातील प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षण ‎थांबवण्याची मागणी करण्यात आली ‎आहे. ग्रामस्थ, सरपंच आणि पोलिस ‎पाटील यांनी या कंपन्यांना विरोध करावा,‎असे आवाहन करत या प्रकल्पांमुळे‎ जल, जंगल आणि जमीन धोक्यात‎ येऊन स्थानिकांच्या अस्तित्वावर संकट ‎येईल, असा दावा यात करण्यात आला‎ आहे. सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण ‎कारवायांमुळे जिल्ह्यातील नक्षलवादी‎ कारवाया कमकुवत झाल्याचा दावा‎ प्रशासन करत असतानाच हा प्रकार‎समोर आल्याने पोलिसांनी‎ घटनास्थळावरील साहित्य जप्त केले ‎असून, संवेदनशील जंगल भागात सुरक्षा‎व्यवस्था वाढवून तीव्र शोध मोहीम सुरू‎ केली आहे.‎ ‎‎मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ही राष्ट्रीय‎ स्तरावरील नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे.‎आणि तो अशा प्रकारची पत्रकबाजी करीत‎ नाही. सदर पत्रामध्ये कुठेही माओवाद किंवा‎ नक्षलवाद असा उल्लेख नाही. त्यामुळे हे‎ पत्रक फेक आहे. सध्या दक्षिण गडचिरोली‎मध्ये खाण विषयावरून वेगवेगळ्या ‎कंपन्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे ‎एखाद्या कंपनीला येथे स्थान मिळू नये यासाठी‎ दुसऱ्या एखाद्या कंपनीने आपल्या ‎दलालामार्फत असे फेक पत्रक व बॅनर लावून‎ दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असण्याची‎ शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‎पोलिसांनी या पत्रकाची सखोल चौकशी ‎करावी.‎ – कॉ. अमोल मारकवार, जिल्हा‎ महासचिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी.‎ बॅनर आणि पत्रकांची चौकशी सुरू‎ पिपली बुर्गी परिसरात आढळलेल्या बॅनर आणि ‎पत्रकांची चौकशी सुरू आहे. ते खरोखर‎ नक्षलवाद्यांनीच लावले आहेत का की आणखी‎ कोणी, याची खातरजमा केली जाईल.‎ – एम.रमेश, पोलिस अधीक्षक, गडचिरोली‎ लोकांच्या डोक्यातून अद्याप‎ नक्षलवाद गेलेला नाही !‎ या पत्रकात कॉमरेड अशोक मार्क्सवादी कम्युनिस्ट‎ पार्टी असा उल्लेख असल्यामुळे या पत्रकाच्या ‎वैधतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. उल्लेखनीय ‎आहे की नक्षलवादी पत्रकांमध्ये कम्युनिस्ट पार्टी ‎माओवादी असा उल्लेख असतो. मागील दहा -‎पंधरा वर्षांच्या काळातील नक्षलवाद्यांच्या ‎पत्रकांमध्ये ”माओवादी” असाच उल्लेख आला‎ आहे. पत्रकातील भाषा जरी नक्षलवादी पद्धतीची ‎असली तरी त्यात भाषेची बरीच तफावत आहे.‎त्यामुळे हे पत्रक आणि मजकूर हा कुणीतरी‎ स्थानिक नागरिक, ज्याला अजूनही अशा‎ प्रकल्पांना विरोध व्हावा असे वाटते. त्याने हा उद्योग‎ केला असावा. असा संशय व्यक्त केला जात आहे.‎ पोलिस याची सत्यता लवकरच समोर आणतील.‎परंतु लोकांच्या डोक्यातून नक्षलवाद अद्याप गेलेला ‎नाही. हे मात्र या निमित्ताने स्पष्ट होताना दिसत आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *