![]()
स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सोलरयान’ने आपल्या बिझनेस विस्ताराचा नवा टप्पा म्हणजेच ‘सोलरयान 2.0’ जाहीर केला आहे. केवळ सोलर इन्व्हर्टर बनवणारी कंपनी अशी स्वतःची मर्यादित ओळख ओलांडून, आता कंपनीने सर्वसमावेशक स्वच्छ ऊर्जा उपाययोजना (Comprehensive Clean Energy Solutions) पुरवण्यावर आपला मोर्चा वळवला आहे. नव्या धोरणात्मक बदलासह कंपनीने आगामी आर्थिक वर्ष 2028-29 पर्यंत 1000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. 2019 मध्ये स्थापन झालेली सोलरयान ही कंपनी ‘स्वच्छ ऊर्जेद्वारे अब्जावधी लोकांचे जीवन सक्षम करणे’ या ध्येयाने भारतात हरित ऊर्जेच्या क्रांतीला गती देत आहे. 5 लाख सौर प्रकल्पांचा टप्पा पार; हायब्रिड ऊर्जेवर भर गेल्या आर्थिक वर्षात देशभरात तब्बल 5 लाखांहून अधिक सौर प्रकल्पांना यशस्वीरित्या ऊर्जा पुरवल्यानंतर कंपनीने आपल्या या नव्या प्रवासाची घोषणा केली आहे. सध्या गुजरातमध्ये कंपनीचे भक्कम नेटवर्क असून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, बिहार आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये कंपनी वेगाने पाय पसरत आहे. प्रामुख्याने तीन प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करणार विकासाच्या नव्या टप्प्यात विस्तार आणि नावीन्यतेवर भर सोलारयानचे संस्थापक मनोज पटेल म्हणाले की, ‘गेल्या 6 वर्षांत आम्ही सोलर इन्व्हर्टर क्षेत्रात एक मजबूत पाया तयार केला आहे. आता भारताची ऊर्जा व्यवस्था वेगाने बदलत असून ग्राहक स्वतःची वीज निर्माण करणे आणि ती साठवण्याकडे वळत आहेत. सोलरयान 2.0 च्या माध्यमातून आम्ही घरे आणि उद्योगांसाठी एक हक्काचा ऊर्जा भागीदार बनू. आर्थिक वर्ष 2028-29 पर्यंत ₹1000 कोटींचे लक्ष्य गाठण्यासोबतच, आमची उपस्थिती 15 हून अधिक राज्यांत वाढवणे आणि आमचे ईपीसी (EPC) पार्टनर नेटवर्क दुप्पट करणे हे आमचे ध्येय आहे.’ दीर्घकालीन मूल्यनिर्मितीचे लक्ष्य कंपनीचे सह-संस्थापक शालिन बोटाड्रा यांनी सांगितले की, ‘हा विस्तार ग्राहक आणि पार्टनर्ससाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारा ठरेल. तर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चिराग पटेल यांनी स्पष्ट केले की, कंपनीची संपूर्ण कार्यसंस्कृती ‘मनशा’ (उद्देश) या संकल्पनेवर म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स, राष्ट्रनिर्माण आणि उत्तरदायित्व या मूल्यांवर आधारित आहे.’ नव्या कॉर्पोरेट लोगोचे अनावरण नव्या टप्प्यात कंपनीने आपल्या नव्या लोगोचेही अनावरण केले आहे. सूर्यापासून प्रेरित असलेल्या या लोगोमध्ये ‘सोलरयान’ नावातील 9 अक्षरांचे प्रतिनिधित्व करणारे नऊ आरे आहेत, जे ऊर्जा आणि प्रगतीचे प्रतीक आहेत. तसेच कंपनीच्या मूळ प्रवासाची आठवण म्हणून जुन्या लोगोमधील ‘रॉकेटचा घटक’ यात कायम ठेवण्यात आला आहे.
Source link
सोलरयान 2.0 चे अनावरण:आर्थिक वर्ष 2028029 पर्यंत ₹1000 कोटी उत्पन्नाचे लक्ष्य; 15 हून अधिक राज्यांत विस्ताराची योजना