Headlines

पाक गँगस्टर भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय:पुण्यामधील 66 तरुणांची एटीएसकडून कसून चौकशी




पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया चालवणारा गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या टोळीच्या संपर्कात असलेल्या पुणे जिल्ह्यातील ६६ जणांची राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी सखोल चौकशी केली. भट्टी हा सोशल मीडियाचा वापर करून तरुणांची माथी भडकवून देशविघातक कारवायांमध्ये ओढत असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर ही व्यापक कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई सुरू केली. जिल्ह्यातील तब्बल २३ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. शहजाद भट्टी, त्याचे साथीदार हे फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमांवर बनावट खाती उघडून तरुणांशी संपर्क साधत होते. दिल्लीतील पेट्रोलबाँम्ब हल्ल्याच्या कटाप्रकरणी अटक केलेल्या काही आरोपींच्या चौकशीतून भट्टी नेटवर्कचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आले आहे. त्यानुसार १० जुलै रोजी एटीएसच्या ५८ पथकांनी राज्यभरातील १४ युनिट्सद्वारे १५० हून जास्त संशयितांची चौकशी करून काही जणांना ताब्यातही घेतले होते. बेरोजगार, उच्चशिक्षित तरुण भट्टी गँगच्या निशाण्यावर भट्टीची टोळी प्रामुख्याने धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयांचा आधार घेऊन तरुणांमध्ये असंतोष निर्माण करत होती. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे संदेश पाठवून त्यांना आकर्षित केले जात होते. देशाची शांतता भंग करण्यासाठी आणि देशांतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर हस्तक निर्माण करणे, हा यामागील मुख्य हेतू होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *