Headlines

200 कोटींच्या प्रकल्पात 200 खोल्यांचे हॉस्पिटॅलिटी केंद्र:'हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट प्लॅन'मुळे रिअल इस्टेटला नवी दिशा




पुण्याच्या रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. देशातील आघाडीचे विकासक ‘अरिस्टा डेव्हलपर्स’ आणि ‘सीएलएस’ यांनी भागीदारी करत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रवेश केला आहे. या भागीदारीतून पूर्व पुण्याच्या व्यावसायिक हबमध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक भव्य मिश्र-वापर प्रकल्प उभारला जाणार आहे. मुंबईतील बीकेसी प्रमाणे या प्रकल्पात २०० खोल्यांच्या अत्याधुनिक हॉस्पिटॅलिटी सुविधेचा समावेश असेल. या प्रकल्पासोबतच पुण्यात प्रथमच ‘हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एचआयपी) ही एक नाविन्यपूर्ण गुंतवणूक योजना सादर करण्यात आली आहे. या मॉडेलमुळे गुंतवणूकदारांना हॉस्पिटॅलिटी प्रकल्पांच्या दैनंदिन व्यवस्थापनाची किंवा त्यांच्या संचालनाची कोणतीही गुंतागुंत न हाताळता, व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित हॉस्पिटॅलिटी मालमत्तांमध्ये थेट गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. सध्या नियमित आणि स्थिर उत्पन्न देणाऱ्या व्यावसायिक रिअल इस्टेट गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. हे नवीन मॉडेल त्यांच्या बदलत्या अपेक्षांशी सुसंगत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या धोरणात्मक भागीदारीबाबत बोलताना अरिस्टा डेव्हलपर्सचे संचालक विजय अडवाणी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “पूर्व पुण्याचा परिसर भारतातील सर्वाधिक गतिमान व्यावसायिक केंद्रांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे. त्यामुळे येथे उच्च दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी सुविधांची मागणी सातत्याने वाढत आहे.” अडवाणी पुढे म्हणाले, “सीएलएससोबतच्या भागीदारीमुळे स्थानिक विकासातील आमचे कौशल्य आणि संस्थात्मक प्रकल्प नियोजन यांची सांगड घालण्यात आली आहे. या माध्यमातून उभारण्यात येणारा २०० खोल्यांचा हा प्रकल्प गुंतवणूकदार आणि व्यावसायिक प्रवासी या दोघांच्याही बदलत्या गरजा पूर्ण करेल.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *