Headlines

मोसमी वारे सक्रिय; नाशिकला मात्र हुलकावणी:मुंबई-पुणे, संभाजीनगर, जालन्यामध्ये पावसाच्या हजेरीने हवेत गारवा




राज्यात आठवडाभर विश्रांतीनंतर मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह तसेच मराठवाड्याच्या काही भागांत बुधवारी तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. नाशिकमध्ये ढगाळ हवामान होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पाऊस गडप झाल्याने राज्यभरात ऊन व कोरड्या हवामानाचा ताप सहन करावा लागत होता. पण बुधवारी पाऊस परतला. उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पावसासाठी अनुकूल उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत हे क्षेत्र अधिक तीव्र होऊन जमिनीवर उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त पूर्वेकडील वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *