Headlines

आवक घटल्याने शेवगा, वांगी अन् कोथिंबीर कडाडली:भाजीपाल्याची दरवाढ, पालक, कोबी अन् बटाटा स्थिर; बदलत्या हवामानाचा बसतोय मोठा फटका‎



शहर आणि उपनगरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या आवकवर झाला आहे. परिणामी शेवगा, वांगी आणि कोथिंबीरचे भाव कडाडले आहेत. गृहिणींचे बजेट मात्र या दरवाढीमुळ

.

सर्वाधिक दरवाढ शेवगा आणि वांग्याच्या दरात पाहायला मिळत आहे. शेवगा थेट ८० रुपयांवरून १६० रुपये किलोवर पोहोचला आहे, तर वांगी ५० रुपयांवरून १२० रुपये किलो झाली आहेत. कोथिंबीरची जुडीही २० रुपयांवरून थेट ५० रुपयांवर पोहोचली आहे. पालेभाज्यांमध्ये मात्र पालकाची जुडी १० रुपयांवर स्थिर असल्याने ग्राहकांना थोडा दिलासा आहे. तसेच मेथीची जुडी ४० रुपयांवर स्थिर आहे, तर शेपूच्या दरात मात्र ३५ रुपयांवरून ३० रुपये अशी थोडी घसरण झाली आहे.कांदा, बटाटा, कोबी आणि काकडीचे दर स्थिर आहे. टोमॅटोच्या दरात मात्र ६० रुपयांवरून ५० रुपये अशी प्रति किलो १० रुपयांची घट झाली आहे.

केडगाव उपनगर, नालेगाव परिसरात मोठा बाजार भरतो. मुख्य बाजारपेठेत चितळे रोडवरील भाजीपाला बाजार, तर सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक व गुलमोहोर रोडवरील पारिजात चौकाजवळ, बालिकाश्रम रोड, तपोवन रोड, तसेच सिव्हिल हडको परिसरात गणेश चौक, आदी ठिकाणी भाजीपाल्याचे दर महागले आहेत.

वादळी वाऱ्यामुळे झाले नुकसान गेल्या काही दिवसांत झालेल्या अचानक वादळी वारे आणि हवामान बदलाचा मोठा फटका शेतीला बसला. शेतात तयार असलेला भाजीपाला खराब झाल्याने आणि तोडणीला उशीर झाल्याने बाजार समितीमध्ये येणारी आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त, या गणितामुळे विशेषतः शेवगा, वांगी आणि कोथिंबीरचे भाव वधारले आहेत.

सध्याचे बाजारभाव (किलोमध्ये) पालक जुडी – १० रु, मेथी जुडी – ४० रु, कोथिंबीर जुडी – ५० रु, शेपू जुडी – ३० रु, कोबी – ४० रु, फ्लॉवर – ५० रु, काकडी – ३० रु, कांदा – २५ रु, बटाटा – २५ रु, वांगी – १२० रु, कारले – ५० रु, शेवगा – १६० रु, गावरान लसूण – १६० रु, हायब्रीड लसूण – १५० रु, लिंबू – ४० रु, टोमॅटो – ५० रु.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *