![]()
देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही भीमजयंतीनिमित्त जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख चौक, पुतळे परिसर आणि विविध भागांत सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत आहे. ठिकठिकाणी भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. निळ्या झेंड्यांनी आणि आकर्षक सजावटीने संपूर्ण परिसर निळामय दिसत आहे. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि समाजजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून प्रमुख ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रम शांततेत पार पडत आहेत. प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी ब्लॉगला भेट द्या….
Source link
संभाजीनगर शहरात भीमजयंतीचा उत्साह:मिरवणुका, मोफत पुस्तक वाटप, रक्तदान शिबिरे; पोलिसांचा कडक बंदोबस्त, नेत्यांकडून शांततेचे आवाहन