Headlines

फुलंब्रीत तहसीलमध्ये जनता दरबार:समस्या सोडवण्यात हलगर्जी केल्यास कारवाई, आमदार अनुराधा चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा‎




सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वेळेत सुटलेच पाहिजेत. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात किंवा नागरिकांच्या समस्या सोडवण्यात जर कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला, तर त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिला आहे. फुलंब्री तहसील कार्यालयात नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. या जनता दरबारात फुलंब्री तालुक्यातील शेकडो नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित आपल्या तक्रारी आणि मागण्या लेखी स्वरूपात मांडल्या. आमदार चव्हाण यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि संबंधित विभागाच्या प्रमुखांना बोलावून जाब विचारला. या वेळी रोजगार हमी योजना, कृषी, महसूल, घरकुल, महावितरण आणि पाणीपुरवठा या विभागांच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. अनेक सामान्य प्रश्न आमदारांनी जागेवरच निकाली काढले, तर गुंतागुंतीच्या प्रकरणांवर महिनाभरात योग्य कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, जि. प. सदस्य निखिल चव्हाण, पंचायत समिती उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे, तहसीलदार योगिता खटावकर, गटविकास अधिकारी प्रसाद खेडेकर यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या, तुम्ही जनतेचे सेवक आहात, त्यामुळे त्यांची कामे प्रामाणिकपणे करा. जर कामात कसूर केली, तर कारवाई करण्यात येईल. दर शुक्रवारी फुलंब्री तहसील कार्यालय आणि दर सोमवारी छत्रपती संभाजीनगर तालुका जनसंपर्क कार्यालय येथे नियमित जनता दरबार होणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *