![]()
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाकडून (इस्कॉन) रविवारी (१९ जुलै) पुण्यात भगवान जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे. या रथयात्रेनिमित्त शहरातील मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत दुपारी १ ते सायंकाळी ७.३० या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. रथयात्रेचा प्रारंभ टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकातून होईल. ही यात्रा टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, उंबऱ्या गणपती चौक (शगुन चौक), रमणबाग चौक, ओंकारेश्वर मंदिर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता या मार्गाने जाणार आहे. स. प. महाविद्यालयाजवळच रथयात्रेची सांगता होईल. या रथयात्रेमुळे रविवारी दुपारी १ ते सायंकाळी ७.३० या वेळेत वाहतूक बदल लागू राहतील. हे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. स. प. महाविद्यालयातून रथयात्रा सुरू झाल्यानंतर टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लालबहाद्दुर शास्त्री रस्ता, सेनादत्त चौक, दांडेकर पूल चौकातून इच्छितस्थळी जावे. पूरम चौकातून टिळक रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौकातून मार्गक्रमण करावे. रथयात्रा पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावर आल्यानंतर, वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्तामार्गे जावे. तसेच, रथयात्रा लक्ष्मी रस्ता परिसरात असताना, वाहनचालकांनी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, शनिवार वाडा या मार्गांचा वापर करावा. रमणबाग ते ओंकारेश्वर दरम्यान रथयात्रा आल्यास, वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्ता किंवा लक्ष्मी रस्त्याचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
पुणे मध्यभागात उद्या जगन्नाथ रथयात्रेनिमित्त वाहतूक बदल:दुपारी 1 ते सायंकाळी 7.30 पर्यंत हे मार्ग राहतील बंद