Headlines

सत्य परिस्थिती प्रभाविपणे समाजासमोर पोहोचवण्यात छायाचित्रकारांचे योगदान:सटाण्यातीलनिकॉन कार्यशाळेत नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांचे प्रतिपादन‎



छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटना, भावना आणि वास्तव प्रभावीपणे जतन केले जाते. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील सत्य परिस्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात छायाचित्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सटाणा नगराध्यक्षा हर्षद

.

येथील सप्तपदी लॉन्स येथे बागलाण तालुका छायाचित्रकार फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त तसेच निकॉन कंपनीच्या विशेष छायाचित्रण कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात छायाचित्रकारांनी आधुनिक उपकरणे आणि नव्या तंत्रांचा सातत्याने अभ्यास करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते देवमामलेदार यांच्या प्रतिमेचे तसेच कॅमेऱ्याचे पूजन करून करण्यात आली. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, सचिव नंदू विसपुते आणि तालुकाध्यक्ष अनिल मोहिते यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. निकॉन कंपनीचे प्रतिनिधी रंजन झिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरावर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यशाळेत आधुनिक छायाचित्रण तंत्रज्ञान, प्रकाशयोजना, कॅमेरा हाताळणी आणि व्यावसायिक छायाचित्रणातील नव्या संकल्पनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मॉडेलच्या प्रात्यक्षिक छायाचित्रणाद्वारे उपस्थित छायाचित्रकारांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी निकॉन कंपनीचे अमित झा, नरेश वडजे, अनिता निकम, खंडू भोई यांच्यासह फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, देवळा तालुकाध्यक्ष देवा भामरे, सचिव सतीश नवसार, धनराज खैरनार आदींसह तालुक्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *