Headlines

विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा बुरुडगावातून पंढरीकडे मार्गस्थ:बुरुडगाव येथील दिंडीतील वारकऱ्यांचा विमा, रुग्णवाहिकेचीही सोय‎



तालुक्यातील बुरूडगाव येथील पावन हनुमान मंदिर श्री क्षेत्र बुरूडगाव पायी दिंडी सोहळा आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मार्गस्थ झाला. गावातील प्रत्येक रस्ता विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. विठ्ठलन

.

यादव परिवाराच्यावतीने दिंडीसाठी चांदीच्या पादुकांची भेट देण्यात आली. या पादुकांचे पूजन करून भक्तिभावाने पालखीत विराजमान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, वारकऱ्यांना आरोग्य, सुरक्षा आणि आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देणारी ही दिंडी इतर दिंडींसाठी आदर्शवत आहे. विशेषतः प्रत्येक वारकऱ्याचा विमा काढण्याचा अभिनव उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून इतर दिंडींनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा.

वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन चालणारे झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळे, फुलांनी सजवलेला रथ, डोक्यावर तुळस आणि कळस घेतलेल्या महिला तसेच हजारो विठ्ठलभक्तांच्या सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही वारकरी महिलांसोबत फुगड्यांचा फेर धरत वारीतील भक्ती आणि सामाजिक समरसतेचा सुंदर संदेश दिला. हभप राहुल दरंदले महाराज, हभप दीपक महाराज भवर, हभप रामभाऊ वाघ आणि हभप कार्तिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. नरेंद्र फिरोदिया यांच्यावतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका, निवासी डॉक्टर तसेच आवश्‍यक औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *