Headlines

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुण्यात आंदोलन:वकील आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी




सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुण्यात सोमवारी वकील आणि विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे आंदोलन केले. शिवाजीनगर न्यायालय परिसरात संविधान रक्षक वकील फोरमने निदर्शने केली, तर आंबेडकर पुतळा परिसरात विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संविधान रक्षक वकील फोरमच्या वतीने झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने वकील आणि संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या वांगचुक यांना कोणतीही चर्चा न करता ताब्यात घेतल्याचा आरोप करत या कारवाईचा निषेध करण्यात आला. मतभिन्नता व्यक्त करणे आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी बोलताना अॅड. तोसिफ शेख म्हणाले की, वांगचुक यांना साध्या वेशातील पोलिसांनी ताब्यात घेणे हा भारतीय लोकशाही आणि संविधानावरील गंभीर आघात आहे. जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही वकिलांनी केला. दुसरीकडे, सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील आंबेडकर पुतळा परिसरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) कारभाराची चौकशी करण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी केली. वांगचुक यांच्यावरील कारवाईचाही विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आणि संविधानिक मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *