Headlines

सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही:दोषींवर कठोर कारवाई करू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून आश्वासन




महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत कठोर इशारा दिला आहे. कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असे ते नागपूर येथील नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणाचा संदर्भ देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणात दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अधिकारी चुकीचे वागत असल्यास तक्रार करण्याची व्यवस्था आहे; मात्र कायदा हातात घेणे खपवून घेतले जाणार नाही. तसेच, संपावर गेल्याने राज्याच्या महसुलाचे नुकसान होत असल्याने मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. पक्षाच्या लेटरपॅडच्या वापराबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. लेटरहेडचा वापर केवळ समाजहित आणि जनसेवेसाठीच झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ट्रक माफिया, सट्टा, गोहत्या, अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ देण्यासाठी लेटरपॅडचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे. नीट आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. हे आंदोलन ठोस मुद्द्यांवर आधारित नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. पेपरफुटी प्रकरणात दोषींवर सरकारने आधीच कठोर कारवाई केली आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीसाठी संपूर्ण व्यवस्थेला किंवा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे चुकीचे असून, विरोधक केवळ युवकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *