Headlines

Backward class community provided security in all areas



संत रोहिदास महाराज मंदिराच्या प्रांगणात चर्मकार सेवा समितीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

.

मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, सामाजिक न्याय, राजकीय हक्क आणि आर्थिक सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात भक्कम सुरक्षा दिली. त्यांच्या विचारांमुळेच आज समाजातील वंचित घटक सक्षमपणे उभे राहत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी याप्रसंगी केले.

अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती अरुण परोडकर होते. यावेळी नगरसेवक संदीप शेगोकार, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, महानगराध्यक्ष शिवलाल इंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला राजेश पारोडकर, संतोष भटकर, विष्णू शेगोकार, हिम्मत शेगोकार, दिलीप इंगळे, बाळू पटके अशोक पानझाडे, अजय ढबाले, डॉ. कल्याणी पदमने, उषा भटकर, शीतल भटकर, सुनीता शेगोकार, मंगला चोपडे, लता पारोडकर उपस्थित होते. शिक्षण, एकतेच्या जोरावर प्रगती करण्याचे आवाहन कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संवैधानिक हक्कांमुळे मागासवर्गीय समाजाला शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या क्षेत्रात मोठी संधी मिळाल्याचे सांगितले. तसेच समाजाने शिक्षण आणि एकतेच्या बळावर पुढे जावे, असे आवाहनही मान्यवरांकडून करण्यात आले. बाबासाहेबआंबेडकरांनी वंचितांना भक्कम सुरक्षा दिल्याने समाज उभा असल्याचे यावेळी मान्यवरांकडून सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *