![]()
आषाढी वारीच्या पवित्र पर्वावर, नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीचे विठुरायाच्या पंढरपूर नगरीत अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात आगमन झाले. सोमवारी सकाळी पंढरपूरच्या चौकाचौकात या प्रदक्षिणा दिंडीचे स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. देवगड संस्थानच्या पंढरपूर मठात रंगलेला रिंगण सोहळा वारीतील मुख्य आकर्षण ठरला. भीमा तीराजवळ असलेल्या देवगड संस्थानच्या मठातून सोमवार सकाळी ७ वाजता गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते पुष्पांनी सजवलेल्या पालखीतील पादुकांचे वेदमंत्रांच्या जयघोषात पूजन करण्यात आले. दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेले झेंडेकरी पथक चालत होते. त्यांच्या मागे गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत टाळ-मृदंगाच्या तालावर भजने गाणारे वारकरी आणि डोक्यावर तुळशी-कलश घेतलेल्या महिला भगिनींचा शिस्तबद्ध समुदाय या दिंडीची शोभा वाढवत होता. तब्बल तीन तास चाललेल्या या पायी प्रदक्षिणेची सांगता देवगड मठाच्या प्रांगणात महाआरतीने झाली. या सोहळ्यासाठी संतसेवक नारायण महाराज ससे, हभप गणपत महाराज आहेर, रामनाथ महाराज पवार, संजय महाराज निथळे, लक्ष्मण महाराज नांगरे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.पालखी भीमा नदीच्या पुलावर आल्यानंतर महंतांच्या हस्ते गंगाजलाने पादुकांचे पूजन करण्यात आले आणि चंद्रभागेला (गंगा माई) साडी-चोळी अर्पण करण्यात आली. ही प्रदक्षिणा दिंडी विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचली, तेव्हा संपूर्ण वारकरी समुदायाने विठुरायाला शिरसाष्टांग वंदन केले. या ठिकाणी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते भावपूर्ण आरती करण्यात आली. यावेळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या दिंड्या पंढरपुरात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी दिसत आहे. गंगा पूजन आणि विठ्ठल चरणी वंदन पालखी भीमा नदीच्या पुलावर आल्यानंतर महंतांच्या हस्ते गंगाजलाने पादुकांचे पूजन करण्यात आले आणि चंद्रभागेला (गंगा माई) साडी-चोळी अर्पण करण्यात आली. ही प्रदक्षिणा दिंडी विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचली, तेव्हा संपूर्ण वारकरी समुदायाने विठुरायाला शिरसाष्टांग वंदन केले. या ठिकाणी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते भावपूर्ण आरती करण्यात आली.
Source link
वारी विठ्ठलाची:पंढरपुरात अवतरला भक्तीचा मेळा; डोळे दीपवून गेला देवगडचा रिंगण सोहळा