Headlines

16 लाख पशुधनासाठी मिळणार 4.65 लाख मे.टन हिरवा चारा:चारा टंचाई टाळण्यासाठी 8 हजार 761 हेक्टरवर चारा पिके, 42 लाख लिटर दैनंदिन दूध उत्पादन‎



जिल्ह्यात सुमारे १६ लाख पशुधन असून दैनंदिन दूध उत्पादन सुमारे ४२ लाख लिटरवर आहे. जिल्ह्याच्याअर्थकारण ात पशुधनाचा मोठा वाटा आहे. परंतू, एलनिनो इफेक्ट व संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ४ लाख ६५ मेट्रिक टन चारा उत्

.

संभाव्य चारा टंचाई टाळण्याच्या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाने यंदा चारा विकासाचे नियोजन हाती घेतले असून आतापर्यंत ८ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर विविध चारा पिकांची पेरणी करण्यात आली आहे. या पेरणीतून सुमारे ४ लाख ६५ हजार मेट्रिक टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित असल्याने दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यंदा एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे मोठे खंड पडत असल्याने चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पशुसंवर्धन विभागाने हंगामाच्या सुरुवातीलाच नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्यात मका, ज्वारी या चारा पिकांच्या पेरणीसाठी बियाणांचे वाटप केले. पावसाची अनिश्चितता कायम असली तरी वेळेत केलेल्या पेरणीमुळे आगामी महिन्यांत पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याचा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील पशुधनाची संख्या मोठी असल्याने दरवर्षी चाऱ्याची मागणी वाढते. त्यातच पावसातील खंडामुळे नैसर्गिक कुरणांवरील चाऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन चारा विकास कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आले आहे. पुढील काळात पावसाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. डी.डी. दिघे, पशुसंवर्धन अधिकारी.

मूरघास हा टिकाऊ अन् सकस आहार जिल्ह्यातील १६ लाख पशुधनासाठी चारा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे वाटप करण्यात आले. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध चाऱ्याचे मूरघासात रुपांतर करावे. हा चारा टिकतो, आणि जनावरांनाही सकस आहार मिळतो. जे बियाणे उपलब्ध झाले, ते यंदाच पेरावे कारण भविष्यात उगवन क्षमता कमी होण्याची शक्यता असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *