![]()
नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत देशभरातील बुद्धिबळपटूंनी आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावत उत्कंठावर्धक सामने खेळले. या स्पर्धेत पुण्याच्या ११ वर्षीय शौर्य भोंडवे याने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले तर गिरीश सरवनकर यांनी उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेत प्रथम:शौर्य भोंडवे, द्वितीय:गिरीश सरवनकर, तृतीय:अंशुल ननवाणी, चतुर्थ:मयंक चुलेट, पाचवा:यश वाघ, सहावा:मंदार बक्षी, सातवा:शुभम बाविस्कर, आठवा:ऋषभ जठर, नववा:ऋत्विक जैस्वाल तसेच सोहम जठर या खेळाडूने दहावा क्रमांक मिळवला. बेस्ट १६०० मध्ये प्रथम:इम्रान हुसेन, द्वितीय:श्रीधर तावडे, तृतीय:श्रव्या गवांदे, चतुर्थ:अर्णव तोतला, पाचवा:उत्कर्ष भिलवाडे तसेच बेस्ट १५०० मध्ये प्रथम:यदुनंदन दुबे, द्वितीय:पलेपु संयुक्ता, तृतीय:राज दुधल, चतुर्थ:मसराम समर्थ तसेच हिमांशू मखिजा या खेळाडूने पाचवा क्रमांक मिळवला. अनरेटेड कॅटेगरीमध्ये प्रथम:गौरंग गिरला, द्वितीय:प्रथमेश दरक, तृतीय:कौस्तुभ पितळे, चतुर्थ:सहाई झा, पाचवा:नावंदर वरदान तसेच उत्कृष्ट महिला खेळाडू गटात प्रथम:प्रणिती भावा, द्वितीय:हिरण्मयी कुलकर्णी, तृतीय:भार्गवी मुरुनमयी, चतुर्थ:साक्षी चव्हाण, पाचवी:वेदांती इंगळे ५५ वर्षांच्या पुढील खेळाडू गटात प्रथम:सुनील जोशी, द्वितीय:दीपक ढेपे, तृतीय:सुनील वैद्य, चतुर्थ:वासवी गोवर्धन, पाचवा:मिलिंद पारले यांनी विजय मिळवला. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट खेळाडू गटात प्रथम:सुनील घोडेराव, द्वितीय:सतीश गाली, तृतीय:आर्यन देवकर, चतुर्थ:वेदांत पानसरे, पाचवा:स्वराज काळे तसेच अहिल्यानगर तालुका खेळाडू गटात प्रथम:निलेश चितळकर, द्वितीय:शिवप्रसाद काळे, तृतीय:नक्ष गांधी, चतुर्थ:दीपक सुपेकर, पाचवा:घनश्याम कुमावत यांनी विजय मिळवला. १५ वर्षांखालील खेळाडू गटात प्रथम:राजदीप पाटील, द्वितीय:राघव भंडारजी, तृतीय:चिन्मय उंबरकर, चतुर्थ:लव्य आगरवाल, पाचवा:पांचल ऋतुराज तसेच १३ वर्षांखाली खेळाडू गटात प्रथम:अनय पिंपरकर, द्वितीय:रमेश हर्षिती, तृतीय:सम्यक कुलकर्णी, चतुर्थ:कुशल झाड, पाचवा:आराध्या ठाकूरदेसाई. ११ वर्षांखालील खेळाडू गटात प्रथम:सर्वध्या बालगुडे, द्वितीय:रियांश बोराटे, तृतीय:हेयान रेड्डी, चतुर्थ:जय मेहता, पाचवा:दर्श पोरवाल यांनी विजय मिळवला. ९ वर्षांखालील खेळाडू गटात प्रथम:अरहम निकम, द्वितीय:अद्विक नवल, तृतीय:शरिया शेळके, चतुर्थ:धवल देशमुख, पाचवा:वेदांत कदम तसेच ७ वर्षांखालील खेळाडूंमध्ये प्रथम:लव्यान पटेल, द्वितीय:चकावे ज्ञानेश्वर, तृतीय:नवीन रणदिवे, चतुर्थ:वेदनकर दिनेश आणि गिरीक पाटीलने पाचवा क्रमांक मिळवला. संयम अन् सरावाच्या बळावर यश निश्चित प्रास्ताविकात संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत बुद्धिबळाचा प्रसार आणि खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या संधींची माहिती दिली. नरेंद्र फिरोदिया म्हणाले, विजय आणि पराभव हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. पराभवाने खचून न जाता त्यातून शिकून अधिक मेहनत घ्यावी. सातत्य, संयम आणि सराव यांच्या जोरावर प्रत्येक खेळाडू मोठे यश मिळवू शकतो. आजचे पराभव उद्याच्या विजयाची पायाभरणी असतात. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देऊन त्यांना गौरवण्यात आले.
Source link
पुण्याचा गिरीश सरवनकर ठरला उपविजेता:नवख्या खेळाडूंच्या चालींनी दिग्गजांना चकवा, पुण्याचा गिरीश सरवनकर ठरला उपविजेता, नवख्या खेळाडूंच्या चालींनी दिग्गजांना चकवा