![]()
नीट पेपरफुटीची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने केली. यासाठी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याच अनुषंगाने दिल्लीतील पर्यावरणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या उपोषणालाही संघटनेने पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. या मागण्यांसाठी क्रॉकरोच जनता पक्ष आणि वांगचुक उपोषण करत आहेत. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला भीमशक्ती संघटनेने पाठिंबा दिला. केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. अशोक प्रतिष्ठान व भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या संयुक्त बैठकीत हा निषेध करण्यात आला. यावेळी अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भीमशक्तीचे नेते प्रा. डॉ. विजय आठवले, प्रदेश सरचिटणीस मधुसूदन भटकर, पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, ॲड. भूषण गायकवाड, अनिल तायडे, पद्माकर वासनिक, अनिल गवई, किशोर शिरसाट, बाळकृष्ण शिरसाट, विद्याधर मोहोड, अरुणाताई लबडे, संदेश गवई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
पेपरफुटीला जबाबदारांवर कारवाई करा:भीमशक्ती संघटनेची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा