![]()
परिसरातील सफियाबादवाडी येथील २५ वर्षीय युवकाने शेतवस्तीवरील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. प्रवीण राजाराम जाधव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रवीण यांचे कुटुंब शेतातील वस्तीवर राहते. आई-वडील पंढरपूरला दिंडीसोबत गेलेले होते. घरातील इतर सदस्य व पत्नी शेतात गेलेले असताना, प्रवीण यांनी राहत्या घरात गळफास घेतला. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रवीण यांचे दाजी राहुल सतीश अवताळे (रा. मालेगाव, ता. वैजापूर) यांनी त्यांना तात्काळ बेशुद्ध अवस्थेत शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत प्रवीण जाधव याचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांचे कुटूंबीय शेतातील वस्तीवर राहतात. आई-वडील पंढरपूरला दिंडीसोबत गेलेले होते. घरातील इतर सदस्य व पत्नी शेतात गेलेली असताना, प्रवीण यांनी राहत्या घरात गळफास घेतला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. २ वर्षांपूर्वी झाला विवाह
Source link
सफियाबादवाडी येथील 25 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट, घरातील सदस्य शेतात असताना उचलले टोकाचे पाऊल