![]()
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी पहाटे ४ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर झालेल्या अपघातात नांदेड शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये मायलेक आणि चिमुकलीचा समावेश आहे. ते हैदराबादकडे कारने न
.
नांदेड येथील बागबान कॉलनी, मशिद कुबा गल्ली परिसरातील कुटुंबिय कारने हैदराबाद विमानतळाकडे जात होते. या भीषण अपघातात मौलाना मोहम्मद नदीम, त्यांची आई शमीमा बेगम आणि ४ वर्षांची मुलगी अनाबिया तस्कीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे धाकटे बंधू नविद गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदेड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. घटनास्थळावरील स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
सौदीतून येणाऱ्यांना घेण्यासाठी जात होते
सौदी अरेबियातून हैदराबाद विमानतळावर पोहोचणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी हे कुटुंब नांदेडहून निघाले होते. मात्र, संगारेड्डी जिल्ह्यातील बचूपल्ली परिसरात काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि आनंदाच्या भेटीचा प्रवास दुर्दैवी दुर्घटनेत बदलला.