Headlines

भिवंडीत भीषण अपघात:ओव्हरटेकच्या नादात कारची 3 दुचाकींना धडक, उड्डाणपुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू




भिवंडी शहरात आज एक भीषण अपघात झाला आहे. भिवंडीतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर एका भरधाव कारने तीन दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, एक दुचाकीस्वार थेट पुलावरून खाली फेकले गेला. उड्डाणपुलावरील थरकाप उडवणारा अपघात भिवंडीतील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर एका कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण गमावले. या भरधाव कारने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी भयंकर होती की, एका दुचाकीस्वाराचा पुलावरून थेट खाली पडून जागीच मृत्यू झाला. या घटनेत शाहरुख खान (वय ३२) आणि आलम शाह (वय ४७) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने भिवंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्या कारने धडक दिली, त्या कारवर ‘ॲडव्होकेट’ असा लोगो लावलेला होता. या घटनेत कारचालकालाही किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांची धाव आणि वाहतूक कोंडी अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत वाहतूक सुरळीत केली. सध्या मृत दुचाकीस्वाराची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, शांतीनगर पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. नवी मुंबईत गुंडांचा उपद्रव:कोपरखैरणेत शिवसेना शाखेसमोर तरुणावर हल्ला; वाचवायला आलेल्या आईच्या डोक्यात मारला चॉपर नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे सेक्टर-19 परिसरात रात्रीच्या सुमारास गुंडगिरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर बसण्याला विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. इतकेच नव्हे, तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या आईलाही आरोपींनी सोडले नाही; तिच्या डोक्यात शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दहशतीचे वातावरण पसरले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *