![]()
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर अधिक भर द्यावा. तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेस भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भेटीदरम्यान निकम यांनी शाळेतील वर्गखोल्या, संगणक कक्ष, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व पटांगणाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचा दर्जा उंचावणे ही काळाची गरज असून शिक्षकांनी अध्यापनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी शाळा, पालक आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, ग्रामपंचायत अधिकारी भीमराज दाणे, केंद्रप्रमुख बबनराव तगरे, मुख्याध्यापक अल्लाउद्दीन शेख, चांद अमेर सहाब, आरोग्य सेविका अर्चना शिंदे, अशरफ खान, उत्तम पवार, मगर, सोनवणे, शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी प्राणायाम काळाची गरज : डॉ. हाश्मी विद्यासागर कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. नायला हाश्मी यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. दररोज १० ते १५ मिनिटे प्राणायाम केल्यास ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढतो, असे डॉ. हाश्मी म्हणाल्या.
Source link
खंडाळा शाळेतील वर्गखोल्या, संगणक कक्ष:स्वच्छतागृह व पटांगणाची पाहणी, खंडाळा शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार- जि. प. सदस्य संजय निकम