Headlines

Amit Thackeray Slams Government Over NEET Paper Leak


नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांच्या दडपशाहीवर सडकून टीका केली. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यां

.

आंदोलनाचा चेहरा विद्यार्थीच असतील

येत्या २६ तारखेला मुंबईत होणाऱ्या महामोर्च्याबाबत माहिती देताना अमित ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या या आंदोलनाचा मुख्य चेहरा केवळ विद्यार्थीच असणार आहेत.” या आंदोलनाला गालबोट लागू नये आणि यामध्ये कोणतेही घुसखोर शिरू नयेत, यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच नियोजनासाठी आज एक महत्त्वाची बैठकही बोलावण्यात आली होती.

दडपशाहीवर तीव्र संताप

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईचा अमित ठाकरेंनी निषेध केला. “सरकारने आता ३ मागण्या मान्य केल्या आहेत, त्याबद्दल देशाचे अभिनंदन. पण, जर या मागण्या आधीच मान्य केल्या असत्या, तर या तीव्र आंदोलनाची गरजच पडली नसती. दिल्लीत मुलींचे कपडे फाडले गेले, मुलांवर अमानुष लाठीचार्ज झाला. शिवतीर्थावर दररोज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमत आहेत, आम्ही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरणार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, आता विद्यार्थ्यांवर कुणालाही हात उचलू देणार नाही आणि त्यांच्यावर केसेसही होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाच!

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाच’, या मागणीवर अमित ठाकरे ठाम राहिले. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य हक्काच्या लढाईत मनसे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

देश पेटून उठलाय, पंतप्रधानांनाही भीती

पंतप्रधान या प्रकणावर बोलले, यावर देत अमित ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान आता यावर बोलत आहेत, याचाच अर्थ कुठेतरी त्यांच्या मनातही भीती आहे की हा देश पेटून उठला आहे. हे आंदोलन म्हणजे कुठल्या एका राजकीय पक्षाचे आंदोलन राहिलेले नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला आहे. त्यामुळे जोपर्यंत विद्यार्थी रस्त्यावर आहे, तोपर्यंत आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील.

हेही वाचा..

एखाद्याने आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते!:नीट पेपरफुटीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य, मनसेची टीका- 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू आंबा चोरल्यासारखं वाटतोय?

‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापले आहे. यातच आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (24 जुलै) एका पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या एका अजब वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “एखाद्याने आंबा चोरला, म्हणून त्याची शिक्षा फाशी असू शकत नाही,” असा युक्तिवाद त्यांनी पेपरफुटी प्रकरणावर बोलताना केला. या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.