![]()
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील १६० कोटीच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्या कारनाम्याची धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासात समोर आली. २८ ऑस्ट २०११ ते जून २०२५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील २५९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देत काढलेले शालार्थ आदेश बनावट असल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्यातील ८४१ पैकी सर्वाधिक बोगस आदेश हिंगोणेकरच्या कार्यकाळात दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षण विभाग आणि संस्था चालकांच्या टोळीने बोगस शालार्थ आयडीने शासनाची तब्बल १६० कोटीची आर्थिक फसवणूक केली आहे. या गुन्ह्यात संघटीत गुन्हेगारी कलम वाढवण्यात आले आहे. संस्था चालक, शिक्षणाधिकारी, एजंट रडारवर या घोटाळ्यात हिंगोणेकर एकटा नसून शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी, शिक्षण संस्था चालक,एजंट,सह राजकीय नेत्यांचा या सिंडिकेट मध्ये सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्यातील संशयितांची संख्या वाढणार आहे. वेतन व थकीत रक्कम हडप १) अधिकाराचा गैरवापर करत वैयक्तिक मान्यता देत गैरफायदा. २) स्वत:च्या स्वाक्षरीने २५९ शिक्षक,कर्मचाऱ्यांना मान्यता. ३) ३६८ कर्मचारी जळगावचे यातील ११६ जणांचे कागदपत्र शालार्थ प्रणालीवर अपलोडच केले नाही. ४) हिंगोणेकरला मदत करणाऱ्यांमध्ये बडे अधिकारी आणि नेत्यांचा सहभाग. ५) संस्थाचालक, मुख्यध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न. ६) बोगस आयडीवर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन, थकबाकीची मोठी रक्कम हडप केली.
Source link
शालार्थ आयडी घोटाळा:841 पैकी 259 बोगस आदेश जळगावामधील, शिक्षणाधिकाऱ्याचे कारनामे