Headlines

आषाढी वारी हा समतेचा सोहळा, जगाला दिशा दाखवणारा:पांडुरंगाच्या कृपेने अलनिनो टळला अन् धरणे भरली, माजी मंत्री थोरात यांचे प्रतिपादन‎



पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आणि सर्व भक्तांचे आराध्य दैवत आहे. विठूरायाच्या कृपेने यावर्षी अलनिनोचा धोका टळून चांगला पाऊस झाला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब असून आषाढी वारी हा अध्यात्माचा, समतेचा आणि एकतेचा सोहळा जगासाठी मार्गदर्शक आहे, असे प्

.

संगमनेर मधील चैतन्य नगर येथे विठ्ठल मंदिरात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी समवेत मा.आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, गणेश मादास, यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. माजीमंत्री थोरात म्हणाले, आषाढी वारी हा महाराष्ट्रातील अध्यात्माचा मोठा सोहळा आहे. या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. संत महंतांचा समतेचा आणि मानवतेचा विचार वारकरी संप्रदायांनी पुढे नेला आहे. यामध्ये लहान थोर कोणीही नाही. लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र येतात आणि गुण्यागोविंदाने भक्ती भावाने वारी पूर्ण करतात . यावर्षी अलनिनोमुळे दुष्काळाची मोठी भीती होती. परंतु पांडुरंगाच्या कृपेने यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी असेल तर शेतकरी नागरिक आनंदी व समाधानी असतात. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे,आढळा भोजापूर ही सर्व धरणे भरली आहेत. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

माजी आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले, मानवता हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे. साधुसंतांनी समाज सुधारकांनी हा धर्म आपल्या सर्वांना सांगितला आहे. परंतु सध्या समाजात अंधश्रद्धा आणि धार्मिक वाद वाढत आहे. समतेचा आणि समाजाच्या विकासाचा विचार आपल्या सर्वांना पुढे नेण्यासाठी काम करावे लागणार आहे. डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या, आषाढी वारी हा आनंदाचा सोहळा आहे. लाखो लोक अत्यंत आनंदाने पायी पंढरीला यावेळी जातात. टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर हा प्रत्येकासाठी अत्यंत सुखद क्षण आहे. संगमनेर शहरांमध्ये विविध महाविद्यालय शाळा यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी दिंड्या काढत एकादशी साजरी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *