Headlines

डिलिव्हरी बॉयकडून पोलिसाला धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा:महिलेशी वाद घालताना मध्यस्थी करणाऱ्या हवालदाराला शिवीगाळ, धमकीही दिली




पुण्यात एका डिलिव्हरी बॉयने पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ जुलै रोजी शनिवारवाडा परिसरात घडली. या प्रकरणी पोलीस हवालदार वैभव येसादे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आर्यन अजित सावंत (वय १९, रा. सायली कॉम्प्लेक्स, वाल्हेकरवाडी, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्यन सावंत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. २५ जुलै रोजी तो शनिवारवाडा परिसरातून दुचाकीवरून जात असताना त्याचा एका महिलेशी वाद झाला. वादातून त्याने महिलेला शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. कसबा पेठ पोलीस चौकीतील हवालदार वैभव येसादे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी आर्यनने येसादे यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की केली. ‘मी आताच कारागृहातून बाहेर आलो आहे,’ अशी धमकीही त्याने हवालदार येसादे यांना दिली. या घटनेनंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आर्यन सावंतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कात्रजमध्ये घरफोडी कात्रजमध्ये सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ४७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रजमधील मांगडेवाडीत असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख ४७ हजार रुपयांचे दाागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *