![]()
केंद्र व राज्य शासनाची मनरेगा योजनेचे नव्याने सुधारणा करून जीरामजी ही योजना सुरू केली असून शेतकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अनिता बनकर यांनी केले आहे. बनकर म्हणाल्या की, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. सिंचन विहीर,गायगोठे, शेततळे,विविध फळ व वृक्षलागवड, पाणंद रस्ते सह विविध विकास कामांचा यात समावेश असुन या योजनेच्या माध्यमातून बळीराजा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. या साठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विकसित भारत –जीरामजी (मनरेगा) योजना २०२६-२७ वार्षिक कृती आराखड्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विकासकामांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला गती देण्यासाठी ग्रामीण भागाचा शाश्वत विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, शेतीची उत्पादकता वाढविणे तसेच ग्रामीण नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेकडे ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक यांनी विशेष लक्ष द्यावे, सरपंच आणि कार्यकर्ते यांनी ही योजनेची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहचावी. लाभार्थानी कोणाशीही अर्थिक व्यवहार करु नये असा प्रकार आढळल्यास पंचायत समितीकडे लेखी तक्रार करावी. सर्व प्रस्ताव युक्तधारा पोर्टलवर नोंदवून जिओ-टॅगिंगसह नियमानुसार सादर करणे आवश्यक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार या प्रक्रियेमुळे गावाच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच जलस्रोतांचे संवर्धन, शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यावरण संरक्षण, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार असल्याचे सभापती अनिता बनकर सांगितले.
Source link
शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांचे आवाहन