![]()
पाचोड पैठण तालुक्यातील पाचोड येथील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबिका मार्बल अँड टेक्स्टाइल दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी (द
.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल शिवराजसमोर अंबिका मार्बल अँड टेक्स्टाइल हे दुकान आहे. दुकानाचे मालक हेमंत शांताराम सूर्यवंशी हे शनिवार (दि. २५) रोजी सायंकाळी सहकुटुंब नातेवाइकांकडे गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने तिसऱ्या मजल्यावरील सुमारे दोन बाय अडीच फुटांच्या खिडकीतून घरात प्रवेश केला.
कपाटात ठेवलेला नेकलेस, अंगठी, कानातील दागिने, गळ्यातील चेन आणि २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरट्याने लंपास केला. सूर्यवंशी हे सोमवारी सकाळी आठ वाजता घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.