Headlines

मनमाड कृउबा सभापतिपदी धात्रक:तालुक्यात आमदार कांदे यांचे प्राबल्य असताना सभापती भाजपचा‎




मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदी माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे कार्यकर्ते गणेश धात्रक यांची अविरोध निवड झाली. तालुक्यात आमदार सुहास कांदे यांचे प्राबल्य असताना बाजार समितीमध्ये भाजपचे धात्रक यांची निवड झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. संचालकांची सभा बाजार समितीच्या सभागृहात बोलवण्यात आली. सिन्नर येथील सहाय्यक निबंधक संजय गिते हे प्राधिकृत अधिकारी होते. सभेला १७ सदस्यांपैकी सत्ताधारी गटाचे ११ संचालक उपस्थित होते, तर विरोधी संचालक उपस्थित नव्हते. अध्यासी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. सभापतिपदासाठी धात्रक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाली. उर्वरित पान ४ बाजार समिती स्थापन करण्यात तत्कालीन आमदार जगन्नाथ धात्रक यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळेच मनमाडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. आजच्या समितीच्या सभापतिपदावर त्यांचे सुपूत्र गणेश धात्रक यांची निवड झाली, हे विशेष.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *