![]()
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमात सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार (पुणे) प्रस्तुत ‘संभवामि युगे युगे’ या नृत्याविष्काराचे नववे पुष्प उत्साहात पा
.
हा सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संजय बालगुडे, मिथिलेश कुमार पांडे (झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र), आरती लिंगायत, शहाजी खुने-पाटील, तानाजीराव माने-देशमुख यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व कलाकारांचा सत्कार न्यासाच्या वतीने श्रींची प्रतिमा व कृपावस्त्र देऊन करण्यात आला.
या सोहळ्यास अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, अनिता खोबरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे यांच्यासह न्यासाचे सर्व विश्वस्त, सेवेकरी, कर्मचारी आणि भाविक-श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी मानले. शिवरायांच्या विचारांची आजच्या युगाला गरज: बानगुडे-पाटील छत्रपती शिवाजी महाराजांनी मानवी मूल्ये व चारित्र्याची जपणूक केली. त्यांच्या राज्यातील स्त्री सुरक्षेचा धाक अतुलनीय होता. आजच्या युगाला त्यांच्या विचारांची गरज आहे,” असे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवांतर्गत जनमेजयराजे भोसले व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.कार्यक्रमादरम्यान एम.बी. पाटील सरांसह विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा व १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. भरत जाधव यांच्या श्रीमंत दामोदरपंत नाटकाला प्रतिसाद गुरुपौर्णिमा महोत्सवात केदार शिंदे दिग्दर्शित आणि भरत जाधव अभिनीत ‘श्रीमंत दामोदरपंत’ नाटकाचे ७ वे पुष्प उत्साहात पार पडले. भरत जाधव यांच्या अचूक विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना भुरळ घातली. याप्रसंगी डॉ. संतोष मेहता यांना विशेष गौरव पुरस्कार दिला. या कार्यक्रमात डॉ. रोहिणी पाटील यांनी महिलांना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. या सोहळ्यास संस्था अध्यक्ष जनमेजयराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, कलाकार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदेश बांदेकरांचा खेळ मांडियेला उत्साहात; महिलांची गर्दी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी महिलांची मोठी गर्दी जमली होती. कार्यक्रमात विविध खेळ, गप्पा व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना ५ मानाच्या पैठण्या व २५० घड्याळे पारितोषिक म्हणून देण्यात आली. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा संदेश पाठवला.