![]()
जैन धर्मातील अतिशय पवित्र आणि मंगलमय समजल्या जाणाऱ्या ‘समर्पण चातुर्मासा’ निमित्त उपाध्याय प्रवर पूज्य प्रविणऋषीजी यांचा रविवारी सकाळी आनंदधामच्या प्रांगणात ऐतिहासिक मंगल प्रवेश झाला. विनायक नगर (बोरा फार्म) येथून निघालेल्या या मंगल प्रवेश सोहळ्याने
.
तब्बल १७ वर्षांनंतर उपाध्यायश्री आपल्या गुरूदेवांच्या पुण्यभूमीत चातुर्मासासाठी विराजमान झाल्यामुळे नगरकर भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या शोभायात्रेत अर्हम विज्जा परिवाराच्या १००८ कलशधारी महिला आणि आगम मंडळाच्या १००८ महिला शिस्तीत सहभागी झाल्या होत्या. अग्रभागी जैन ध्वज घेतलेली मुले, विविध युवक-युवती आणि महिला मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होती. भगवान महावीर व आचार्यश्रींच्या प्रतिमा असलेली सजवलेली वाहने आणि अर्हम विज्जा परिवाराच्यावतीने चार महिन्यांत होणाऱ्या विविध शिबिरांची माहिती देणारे आकर्षक देखावे आकर्षण ठरले.
शोभायात्रेद्वारे आनंदधाम येथे उभारण्यात आलेल्या ‘आनंद तीर्थ समवसरण’ येथे उपाध्यायश्रींचे आगमन झाले. या सोहळ्याला महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी, पूज्य आलोकऋषीजी, पूज्य तिर्थेशऋषीजी, साध्वी पूज्य सत्यप्रभाजी, साध्वी पूज्य अमितज्योतीजी, आ. संग्राम जगताप, राष्ट्रीय पाठशाळेचे अध्यक्ष विद्याधर काकडे, माजी जि.प. सदस्य हर्षदा काकडे, नगरसेवक गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रकाश भागानगरे, मर्चंटस बँकेचे चेअरमन संजय चोपडा, तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, राखी बोरा, उपस्थित होते.
कमिटी अध्यक्ष अशोक बोरा म्हणाले, तब्बल १७ वर्षांनंतर उपाध्यायश्री आपल्या गुरूदेवांच्या पुण्यभूमीत चातुर्मासासाठी विराजमान झाले आहेत. हा ऐतिहासिक क्षण असून सर्वांनी तन, मन आणि श्रद्धेने विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांत सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा. आ. जगताप म्हणाले, अहिल्यानगर शहरासाठी हा सुवर्णक्षण आहे.
आचार्यश्रींच्या पावन भूमीत उपाध्यायश्रींच्या मार्गदर्शनात खऱ्या अर्थाने धर्म जागरण सुरू झाले असून प्रत्येकाने या पर्वकाळाचा लाभ घ्यावा. पूज्य प्रविणऋषीजी म्हणाले, १७ वर्षांनी आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला जसे वाटते, तशाच आनंदाच्या भावना माझ्या मनात आहेत. आभार सचिन देसरडा यांनी मानले मंगल प्रवेशापूर्वी बोरा फार्म येथे ३ हजार जोड्यांच्या सहभागात भव्य ‘सहजोडे भक्तामर अनुष्ठान’ पार पडले.