Headlines

माजी मंत्री महादेव जानकरांसह चौघांची साडेचौदा कोटींची फसवणूक:पनवेलमधील जमीन व्यवहार प्रकरणी चौघांवर गुन्हा‎




रायगड जिल्ह्यातील पनवेल, जि. ‎‎रायगड येथील व्यावसायिक‎ जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात ‎‎माजी मंत्री महादेव जानकरांसह‎ चौघांची 14 कोटी 49 लाख 85‎ हजार 975 रुपयांची फसवणूक ‎‎झाल्याची तक्रार गंगाखेड पोलिस ‎‎ठाण्यात दाखल झाली आहे. या‎प्रकरणी मुंबईतील प्रवीण गुप्ता, मंजू ‎‎गुप्ता, अंकित गुप्ता, संजना गुप्ता या ‎‎चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला‎ आहे. राजेभाऊ श्रीराम फड (48, रा. ‎‎बन पिंपळा, ता. गंगाखेड) यांनी ‎‎दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी ‎‎रायगड जिल्ह्यातील कोळखे (ता.‎पनवेल) येथील व्यवहार करण्यास ‎प्रवृत्त केले. मुंबई येथील टोटल‎ लॉजिस्टिक (इंडिया) प्रा. लि. या‎ कंपनीच्या मालकीची कोळखे (ता.‎पनवेल, जि. रायगड) शिवारातील ‎गट क्रमांक 81, 82 व 83 मधील‎ सुमारे 97.10 गुंठे जमीन व त्यावरील‎ बांधकाम विक्रीस असल्याचे‎ सांगितले. प्रवीण गुप्ता यांनी माजी‎ मंत्री महादेव जानकर यांच्या ‎निवासस्थानी बैठक घेतली. त्या ‎बैठकीस माजी मंत्री महादेव जानकर,‎ महादेव मुंडे, विशाल बुधवंत व ‎राजेश रंजित उपस्थित होते. एकूण ‎प्रॉपर्टी पैकी दोन हिस्से महादेव ‎जानकर व राजेभाऊ फड यांना विक्री‎ करण्याचे ठरवले.‎ या प्रॉपर्टीच्या विक्रीच्या ‎नावाखाली राजेभाऊ फड ‎यांच्याकडून 15 जानेवारी 2025 ते 21‎ एप्रिल 2025 दरम्यान प्रवीण गुप्ता व ‎त्यांच्या कुटुंबाने मुंबई येथे तसेच आ.‎डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या ‎फार्महाऊसवर वेळोवेळी रोख व‎ आरटीजीएसच्या माध्यमातून 14 ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎कोटी 49 लाख 85 हजार 975 रुपये ‎स्वीकारले.‎ आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, निळोबा ‎मुंढे, अक्षय मुंढे व अन्य लोक समक्ष ‎होते. 50 टक्के, 49 गुंठे एवढा हिस्सा ‎(पाच वेअर हाऊस, एक साडी ‎शॉपचे बांधकाम व मोकळी जागा)‎ 15 कोटी रुपयांत देण्याचे ठरवले.‎तसा ठरावही करण्यात आला.‎ साडेचौदा कोटी घेऊनही फेरफार‎करून दिला नाही तब्बल‎साडेचौदा कोटी घेऊनही गुप्ता‎कुटुंबाने या प्रॉपर्टीचे खरेदी खत किंवा ‎फेरफार करून दिला नाही. शनिवारी ‎रात्री उशिरा टोटल लॉजिस्टिक‎ (इंडिया) प्रा. लि. कंपनीचे संचालक ‎प्रवीण गुप्ता, त्यांची पत्नी मंजू गुप्ता, ‎मुलगा अंकित गुप्ता व सून संजना ‎गुप्ता, सर्व रा. मुंबई, यांच्याविरुद्ध‎ भारतीय न्याय संहिता (BNS)‎ मधील फसवणूक, विश्वासघात,‎धमकी आदी विविध कलमांखाली‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ याप्रकणी पुढील तपास गंगाखेड ‎पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक‎ श्रीकांत डोंगरे करीत आहेत.‎ व्यवहार विसरून जा,‎अन्यथा तुझा खून होईल‎ टाळाटाळ झाल्याने राजेभाऊ फड‎ यांनी खरेदीखत करून देण्याबाबत ‎विनंती केली. त्या वेळी प्रवीण गुप्ता‎ यांनी दमदाटी केली. त्यांनी फोनवर‎ धमकी दिली, ‘परत कॉल केला ‎अथवा माझ्याकडे आला तर तुला‎ सोडणार नाही. तुझा जीव प्यारा ‎असेल तर माझ्या नादी लागू नकोस.‎आपला व्यवहार विसरून जा,‎अन्यथा तुझा खून होईल,’ अशी‎ फिर्याद राजेभाऊ श्रीराम फड यांनी‎ शनिवारी गंगाखेड पोलिसांत दिली.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *