नीट पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्रातील MPSC चा तसेच CET चा देखील पेपर फुटला असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दखल घेतली आहे. तसेच त्यांनी पेपरफुटीचे पुरावे देखील MPSC कडे दिले असून आयोग
.
रोहित पवार म्हणाले, CET चा जो मुद्दा आहे तो आमच्याकडे देखील आला आहे. त्याच बरोबर बऱ्याच लोकांनी हा मुद्दा आता त्यांच्या त्यांच्या लेव्हलला मांडायला सुरू केले आहे. भाजपचे सरकार जेव्हा पासून आपल्या राज्यात आले आहे, तेव्हापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटले आहेत. काल पत्रकार परिषद जेव्हा घेतली तेव्हा 15 विभाग आम्ही दाखवले जिथे पेपर फुटले आहेत. आता CET चा सुद्धा जर पेपर फुटला असेल तर हे दुर्दैव आहे.
MPSC चा पेपर फुटला, त्याचे पुरावे आमच्याकडे
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, काल पासून भाजपकडून वेगळ्या प्रकारचे आंदोलन वेगवेगळ्या राज्यात सुरू केले आहे. जिथे भाजपचे सरकार नाही, अशा राज्यात पेपर फुटला आहे असे ते आंदोलन करत आहेत. दुसरीकडे आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात भाजपच्या देशातल्या सगळ्या नेत्यांनी यावे आणि त्यांच्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करणे गरजेचे आहे. CET मध्ये आम्ही लक्ष घालणार आहोतच. त्याच बरोबर जी MPSC चा पेपर फुटला, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते दिले आहेत. त्यानुसार तपास देखील सुरू झालेला आहे. कांगाडे नावाचे जे विद्यार्थी आहेत, जे MPSC च्या विद्यार्थ्यांच्या वतीने लढत आहेत, त्यांना आज पोलिसांनी बोलावले आहे. तसेच ज्यांना जास्तीचे मार्क्स भेटले आहेत, त्यांना देखील चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती पवारांनी दिली आहे.
गृहखाते कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का?
गृहखात्याकडे जर अद्याप MPSC पेपरफुटीची माहिती आली नसली तरी आम्ही या संदर्भातले सगळे पुरावे MPSC आयोगाकडे दिले आहेत. त्यांनी यासंदर्भात गंभीर दखल घेत चौकशी देखील सुरू केली आहे. काल संध्याकाळीच आम्ही हे सगळे पुरावे आयोगाकडे दिले आहेत आणि काल संध्याकाळीच MPSC ने गृहखात्याला सांगितले आहे. त्यांना आजच कसे कळाले की यात काहीच झाले नाही? तुम्ही आधी चौकशी तरी करा. लोकांना आता तुम्ही बोलवायला सुरुवात केली आहे आणि तरी तुम्ही म्हणत आहात की यात काहीच झाले नाही. याचा अर्थ गृहखाते कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
फॉरेन्सिक ऑडिट होणे गरजेचे
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, यात आणखी खोलात जावे लागणार आहे. पुरावे तर आम्ही दिलेच, पण फॉरेन्सिक ऑडिट होणे गरजेचे आहे. ज्यांचे नावे आम्ही दिले आहेत त्यांचे व्हॉट्सअप चॅट तपासणे गरजेचे आहे. तो जो कोण पाटील आहे, सकाळपर्यंत चुरुचुरू बोलत होता, जो त्या क्लासेसचा मालक आहे, आता नॉट रिचेबल आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांचे फोन हे पोलिस विभागाने ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. त्यामुळे आता हा पेपर किती लोकांपर्यंत गेला होता, हे कळण्यासाठी यात खोलात जाऊन तपास करणे आवश्यक आहे.
पेपर फुटणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यशी खेळ
रोहित पवार म्हणाले, MPSC ही एक चांगली संस्था आहे, त्या संस्थेचा पेपर फुटणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यशी खेळण्यासारखे आहे. आणि पैसे देऊन जर लोक अधिकारी होणार असतील तर भविष्यात सर्वसामान्य लोकांना देखील अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे यात सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
या संदर्भातील ही देखील बातमी वाचा
लबाडी, फसवणूक आणि विश्वासघात हाच भाजपचा खरा DNA:विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन देऊनही अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “लबाडी, फसवणूक आणि विश्वासघात हाच भाजपचा खरा डीएनए (DNA) असून, त्यांच्या या लबाडीचा योग्य वेळी इंच इंच हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांसमोर सरकारला गुडघे टेकावे लागल्याने भाजपचा अहंकार दुखावला गेला आणि त्यातूनच ही कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा