Headlines

रोखपालाला मारहाण करून 8 लाखांची रोकड लुटली:पुण्यात सिंहगड रस्त्यावर मद्य विक्री दुकानाच्या कर्मचाऱ्याला लुटले




सिंहगड रस्ता परिसरात मद्य विक्री दुकानाच्या रोखपालाला मारहाण करून चोरट्यांनी आठ लाख सहा हजार रुपयांची रोकड लुटली. ही घटना २६ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इंगळे हे नऱ्हे भागातील एका मद्य विक्री दुकानात रोखपाल म्हणून काम करतात. २६ जुलैच्या रात्री दुकानातील जमा झालेली रोकड घेऊन ते दुचाकीवरून सिंहगड रस्ता भागातील प्रयेजा सिटी रस्त्याने जात होते. वारजेकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी इंगळे यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून मारहाण केली आणि आठ लाख सहा हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या इंगळे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक आयुक्त विजय कुंभार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पूर्ववैमनस्यातून भावंडांवर हल्ला पूर्ववैमनस्यातून भावंडांवर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मार्केट यार्ड भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आशुतोष नाना क्षीरसागर (वय २७), ऋषीकेश नाना क्षीरसागर (वय २६, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरमान समीर शेख (वय २५), शाहरुख उर्फ कल्लू शेख (वय २७, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशुतोष याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष आणि ऋषीकेश यांच्या नातेवाईकांचे २६ जुलै रोजी निधन झाले. दोघे जण अंत्यविधीसाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मार्केट यार्डातील डाॅ. आंबेडकरनगर परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी दोघांना अडवले. वैमनस्यातून आरोपींनी आशुतोष आणि ऋषीकेश यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *