Headlines

आज वेरूळ येथे लाखो भाविकांसह गुरुपौर्णिमा सोहळा साजरा होणार:भारतातील सर्वात मोठी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या मूर्तीची होणार पूजा‎




संतपरंपरेची पवित्र भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. ब्रह्मलीन जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात महाराष्ट्रातून लाखो बाबाजी भक्त दाखल होणार आहेत. मिरवणूक आणि पाद्यपूजनाचा मुख्य कार्यक्रम : आश्रमाचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीमध्ये उद्याचा सोहळा संपन्न होईल.सकाळी ८ वाजता परमपूज्य बाबाजींच्या पादुकांची भव्य सहवाद्य मिरवणूक आश्रम परिसरातून निघणार आहे. १० वाजता कार्यक्रमस्थळी पादुकांचे भव्य पाद्यपूजन होईल. या वेळी आश्रमातील साधुसंतांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त संस्कार शिबिर ३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गुरुपौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची २१ फूट उंचीची पंचधातूची मूर्ती बनवण्याचा संकल्प आहे. भारतातील बाबाजींची ही सर्वात मोठी मूर्ती असेल. बोरदहेगाव | गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज जन्मभूमी मंदिर बोरदहेगाव ते जनार्दन स्वामी समाधी मंदिर कोपरगाव (बेट) दिंडीचे प्रस्थान महंत शांतीगिरी महाराज व महंत रमेशगिरी महाराज यांच्या प्रेरणेने सोमवारस २७ जुलै रोजी बोरदहेगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज मंदिर येथून झाले. जन्मभूमी मंदिर बोरदहेगाव येथून निघालेली ही दिंडी बुधवार, २९ जुलै गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दिवशी समाधिस्थळ कोपरगाव बेट या ठिकाणी पोहोचणार आहे. दिंडी सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. या दिंडी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिला-पुरुष भाविकांनी सहभाग नोंदवला. दिंडी सोहळा कोपरगाव बेट येथे पोहोचल्यावर जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर येथे भाविकांच्या हस्ते समधी पूजन,विधी, आरती व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्याचे आयोजन गणेश उगले, सुदाम उगले, वाल्मीक उगले व जय बाबाजी भक्त परिवार बोरदहेगाव यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *