.


दैनिक ‘दिव्य मराठी’च्या ७५ लाख वृक्षलागवड महाभियानात अकोला येथील ‘आनंदी गुरुकुल द ग्रुप ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या वतीने वृक्ष लागवड करत विद्यार्थ्यांनी गुरुवर्य प्रा. डॉ. दीपाली आतिश सोसे यांच्यासोबत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ आणि ‘पर्यावरणपूरक दीपोत्सव’अशा पर्यावरणाचा जागर करणाऱ्या माहितीपटामध्ये तसेच ‘बाप्पा मोरया’ या पर्यावरणपर अल्बममध्ये प्रमुख भूमिका केलेला व अनेक पुरस्काराने सन्मानित झालेला बालकलाकार पर्यावरणप्रेमी स्वराज सोसे यानेही दिव्य मराठीच्या वृक्षलागवड अभियानात सहभाग घेतला. यावेळी क्षितिजा राऊत, अद्विक सोसे, रिया जांगिड, स्वराज सोसे, स्वरांश वाहुरकर,भाविका हिवराळे, ईश्वरी चंदीवाले, वीर अवचार, स्वरा चंदीवाले, जय तायडे, अक्षरा वाघमारे आणि गार्गी तायडे या विद्यार्थ्यांनीही वृक्षलागवड करत सहभाग नोंदवला. याप्रसंगी वृक्षलागवडीचे महत्त्व व वृक्षाचे जतन करण्यासंदर्भात माहिती देत वृक्षाचे आपल्या आयुष्यातील योगदान विद्यार्थ्यांना साध्या शब्दांमध्ये संस्थापक तथा प्रमुख प्रा. डॉ. दीपाली सोसे यांनी समजावून सांगितले. मुलांनी दरवर्षी किमान एक रोपटे लावण्याची शपथ यावेळी घेतली. प्रतिनिधी | अकोला पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी केवळ मोठ्यांची नसून प्रत्येकाची आहे, हे कृतीतून दाखवून देत येथील आर. डी. जी. पब्लिक स्कूलची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी देवश्री हिने दैनिक ‘दिव्य मराठी’च्या ७५ लाख वृक्षलागवड अभियानाची सुरुवात स्वतःपासून केली. हातात एक छोटेसे रोप… परंतु मनात हिरव्यागार भविष्यासाठीचे मोठे स्वप्न. देवश्रीने लावलेले हे रोप केवळ एक झाड नसून, पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ हवा, शुद्ध पर्यावरण आणि सुंदर उद्याची आशा आहे. तिच्या या छोट्याशा कृतीतून समाजाला मोठा संदेश मिळाला आहे. “बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होते. अभियानात प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला तर ७५ लाख वृक्षांचे स्वप्न नक्कीच साकार होईल.