![]()
बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र (बीईजी), खडकी येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 10 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहे. यामध्ये अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (ट्रेड्स
.
भरती मेळाव्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 31 जुलै 2026 रोजी खेळाडूंची तपासणी केली जाईल. 10 ऑगस्ट रोजी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – मराठा प्रवर्ग, तर 11 ऑगस्ट रोजी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – शीख (मजहबी व रामदासी), एम अँड आर तसेच मुस्लिम प्रवर्ग यांच्यासाठी भरती प्रक्रिया होईल. याच दिवशी अग्निवीर (स्टोअर कीपर/ऑफिस असिस्टंट), अग्निवीर (ट्रेड्समन – 8 वी व 10 वी उत्तीर्ण) आणि विविध सपोर्ट स्टाफ पदांसाठीही प्रक्रिया राबवली जाईल. 12 ऑगस्ट रोजी अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) यांची भरती होणार आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान पात्र उमेदवारांची प्रारंभिक तपासणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मापन, कागदपत्रांची पडताळणी आणि संगणक नोंदणी केली जाईल. सर्व उमेदवारांनी संबंधित दिवशी सकाळी 5 ते 8 या वेळेत नंदा गेट, बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी येथे उपस्थित राहावे. सकाळी 8 नंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अग्निवीर खेळाडू (खुला वर्ग) भरतीसाठी फुटबॉल, पोहणे, हॉकी, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, रोईंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, कुस्ती, हँडबॉल, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांतील पात्र खेळाडूंना संधी उपलब्ध आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती, पात्रता निकष, सेवा अटी आणि इतर तपशीलांसाठी उमेदवारांनी www.bsakirkee.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस फिरासत (नि), पुणे यांनी केले आहे.