Headlines

Chandrashekhar Bawankule Challenges Abhijeet Dipke Over BJP Threat Claims


कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 40 दिवसांच्या आंदोलनानंतर घरी परतल्यावर भाजपवर केलेल्या आरोपांना राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याने जर त्यांना

.

अभिजीत दीपकेंनी नाव सांगावं, आम्ही कारवाई करू

अभिजीत दीपके यांनी भाजपवर केलेल्या आरोपांचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे 1 कोटी 51 लाख प्राथमिक सदस्य आहेत, तर देशात 13 कोटी सदस्य संख्या आहे. यापैकी कोणा एका व्यक्तीने जर दीपके यांना धमकी दिली असेल किंवा पक्षात येण्याची ऑफर दिली असेल, तर त्यांनी खुलं नाव सांगावं. आम्ही त्या कार्यकर्त्यावर नक्की कारवाई करू. पण नाव न सांगता भाजपची बदनामी करू नये.” दीपके यांच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान ते शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडे राहिल्याच्या प्रश्नावर बोलताना, “त्यांना कोणाच्या घरी राहायचं आणि कुठे राहायचं, हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे,” असे ते म्हणाले.

‘महाराजस्व शिबिर’ 76 हजार परिवारांना लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागामार्फत राज्यात 22 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबवले जात आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी कधीही स्वतःचे सत्कार व सन्मान सोहळे स्वीकारले नाहीत. त्यांचा वाढदिवस सेवाकार्य करून साजरा व्हावा, या उद्देशाने राज्यातील 10 लाख परिवारांना विविध सरकारी योजनांचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. आज ठाणे शहर जिल्ह्यात 76 हजार परिवारांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे.”

‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ आणि ‘मायक्रो झोनिंग’

ठाणे व मुंबईतील नागरिकांसाठी आणि मालमत्ताधारकांसाठी बावनकुळे यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅटधारकाला आता त्यांच्या हक्काचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार आहे. 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी बांधलेल्या आणि तुकडेबंदी कायद्यामुळे रखडलेल्या घरांना स्वामित्व योजना लागू करून कायदेशीर केले जाणार आहे.

सध्या 500 मीटर किंवा 1 किमी परिसरात सर्वात महागड्या इमारतीचा रेडी रेकनर दर संपूर्ण परिसरातील छोट्या घरांनाही लागतो. हा अन्याय दूर करण्यासाठी आता मुंबई आणि ठाण्यासह राज्याच्या प्रमुख शहरांत प्रत्येक इमारतीचे आणि घराचे ‘मायक्रो झोनिंग’ केले जाईल. यामुळे प्रत्येक घराचा रेडी रेकनर दर वेगळा असेल आणि सामान्यांचा भुर्दंड वाचेल.

राज्यातील आदिवासी वनपट्टाधारक शेतकऱ्यांना आता स्वतंत्र ‘सातबारा’ दिला जाणार आहे. यामुळे त्यांना आता कृषी स्टॅक, पीक विमा आणि केंद्र-राज्याच्या इतर सर्व शेती योजनांचा लाभ मिळू शकेल.

ठाण्यातील महायुतीतील नाराजीवर

ठाण्यातील स्थानिक कार्यक्रमांमध्ये भाजप आमदारांना डावलल्याच्या आणि महायुतीतील वादावर बोलताना ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत प्रगल्भ नेते आहेत. स्थानिक आमदार, मंत्री आणि पालकमंत्री एकत्र बसून हे स्थानिक प्रश्न सोडवतील.”

“मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटममधील त्यांचे सध्याचे मुद्दे काय आहेत, हे आधी पाहावे लागेल. मागे झालेल्या आंदोलनावेळी सरकारने त्यांचे प्रश्न सोडवले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुद्रांक शुल्क बुडवणाऱ्यांवर कारवाई

ठाणे आणि नाशिकमध्ये ज्यांनी मुद्रांक शुल्क बुडवले आहे किंवा गरिबांच्या वाट्याची घरे दिली नाहीत, त्यांची सखोल चौकशी केली जाईल आणि सरकारचा एकही रुपया बुडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच TDR घोटाळ्याच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गरज पडल्यास चौकशी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचा…

नवे शिक्षणमंत्रीही विचित्रच, जे बलात्काऱ्यांचे समर्थन करतात:अभिजित दिपकेंचा संताप, अमित शहांच्या राजीनाम्याची केली मागणी

विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, भाजप आणि पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांवरील लाठीमार, दगडफेक आणि पोलिसांच्या कारवाईबाबत पूर्वनियोजन करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. रामदेव बाबा यांच्यावरही दिपके यांनी निशाणा साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी

2 शिफ्टमध्ये काम अन् सुट्ट्याही रद्द!:तुकाराम मुंढेंविरोधात 29 कर्मचाऱ्यांनी थोपटले दंड; अपुऱ्या मनुष्यबळाचा दावा, थेट मंत्र्यांकडे केली तक्रार

अन्न भेसळविरोधी धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विभागातील अंतर्गत वादामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्टची कार्यपद्धती आणि सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.