![]()
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत धरणात ४८ हजार २६८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. यामुळे धरणाचा उपयुक्त जलसाठा ७२ टक्क्या
.
जायकवाडी धरणातील सध्याची पाणीपातळी १५१६.३१ फूट इतकी झाली आहे. धरणात ५४.६२ टीएमसी (१५४६.७३२ दशलक्ष घनमीटर) इतका जिवंत पाणीसाठा असून एकूण पाणीसाठा ८०.६८ टीएमसी नोंदवण्यात आला आहे. धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ७६.६७ टीएमसी असून त्यापैकी ७२ टक्के साठा भरला असल्याचे प्रशासनाने सांगितले. गुरुवारपासून डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. याचा थेट फायदा पैठण, गंगापूर आणि वैजापूर परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबतचा अंतिम निर्णय आज घेतला जाणार आहे. धरणातील पाण्याची उपलब्धता, आवक आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन हा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी दिली.
मागील वर्षी आजच्या तारखेत धरणात ९० टक्के साठा जायकवाडीत उपयुक्त जलसाठा ७२ टक्के असून, जिवंत पाणीसाठा ५४.६२ टीएमसी, एकूण पाणीसाठा ८०.६८ टीएमसी, पाणीपातळी १५१६.३१ फूट तर पाण्याची आवक ४८,२६८ क्युसेकने सुरू आहे. मागील वर्षी याच तारखेत धरणात ९० टक्के पाणीसाठा होता.