Headlines

अपघात:ट्रक-एसटीची समोरासमोर धडक; एक ठार, ७ जखमी




दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरधाव आयशर ट्रक आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रकमधील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दर्यापूर येथून हिंगणघाटकडे जाणारी एसटी बस लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान पोहोचली असता, दर्यापूरच्या दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रकमध्ये समोर बसलेले शाम महादेव बुटे (३१, रा. धामोरी, ता. भातकुली) याचा जागीच मृत्यू झाला. तर तुळशीराम अशोक कुपटे (२६, रा. खोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक विशाल खोडे (३०, रा. मधलापूर) किरकोळ उर्वरित,पान.४ अपघातामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली अपघाताच्या वेळी परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या भीषण धडकेत ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *