![]()
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात गुरुवारी रात्री एक अंगावर काटा आणणारी थरारक घटना घडली. अल्लीपूर-टाकली मार्गावरील यशोदा नदीला आलेल्या पुरात अक्षय माटे नावाचा तरुण अचानक पाण्याच्या वेगात वाहून गेला. पुराच्या प्रचंड वेगामुळे तो तब्बल १५० ते २०० मीटर अंतरापर्यंत वाहून गेला, मात्र प्रसंगावधान राखत त्याने एका मोठ्या झाडाला घट्ट पकडले आणि त्यावर चढून स्वतःचे प्राण वाचवले. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी रात्रभर घटनास्थळी ठाण मांडून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. अखेर, आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास बचाव पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी मोहीम राबवत या तरुणाला पुरातून सुखरूप बाहेर काढले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अक्षय माटे यांच्याशी सतत संपर्क ठेवण्यात आला असून त्यांना धीर देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तात्काळ बचावकार्य करणे कठीण ठरत होते. दरम्यान, एसडीआरएफची मदत मागविण्यात आली होती. तसेच डीडीआरएफ पथकही घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले. महसूल प्रशासन, स्थानिक यंत्रणा आणि बचाव पथकांनी रात्रभर घटनास्थळी ठाण मांडून परिस्थितीवर लक्ष ठेवले. धाडसी मोहिम राबवत अक्षय माटे सुखरूप अखेर आज पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास बचाव पथकाने नियोजनबद्ध आणि धाडसी मोहिम राबवत अक्षय माटे यांना सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, पुलांवरून पाणी वाहत असताना नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. हेही वाचा.. जळगावच्या चोपड्यात मुसळधार पावसाचा तडाखा:रत्नावतीसह नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागली, वीजपुरवठा खंडित चोपडा तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून ते मध्यरात्रीच्या पावसाने चांगली बॅटिंग करून सर्वत्र तालुका ओलाचिंब केला आहे. अखंडपणे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुका अक्षरशः झोडपून निघाला आहे. ३० जुलैच्या मध्यरात्रीत ३१ जुलैच्या पहाटेपर्यंत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, तर लहान-मोठे नाले आणि नद्यांना पूर आल्याने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. सविस्तर वाचा
Source link
वर्ध्यात मध्यरात्री थरार:पुरात वाहून गेलेल्या तरुणाला झाडाने दिले जीवदान; रात्रभराच्या थरारानंतर पहाटे सुखरूप बचाव