Headlines

"छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात, हे आपण विसरु नये":रोहित पवारांचा मंत्री शिवेंद्रराजेंना खोचक सल्ला, नेमके प्रकरण काय?




राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने सरकारला लक्ष्य करत विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य करत असतात. अशातच आता त्यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका करत एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. सोसायट्यांच्या ठरावासाठी शिवेंद्रराजे हे बाहेरून गुंड बोलावून स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच आपण भाजपमध्ये असलात, वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही. परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात, हे आपण विसरु नये, असा सल्लाही पवारांनी दिला आहे. रोहित पवार म्हणाले, मंत्री शिवेंद्रराजे हे फार चांगल्या स्वभावाचे मंत्री आहेत. त्यांचे आणि आमचे फार आधीपासून संबंध आहेत. ज्या परिवारातून ते येतात त्या परिवाराबद्दल आम्हाला मनापासून अतिशय आदर आहे. मात्र नुकताच आम्हाला असे कळले की शिवेंद्रराजे स्वतः सोबत काही गुंड घेऊन जावळीत सोसायट्याच्या बाबतीत जो ठराव हवा आहे त्यासाठी बळजबरी आणि दमदाटी केल्याचे समोर आले आहे. भाजपसोबत गेल्यापासून ही नवी प्रथा सुरू झाली आहे. यात आता त्यांचा प्रत्यक्ष हात आहे की कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनी हे केले? मात्र मला तरी हे पटत नाहीये. शिवाय माझे मंत्री शिवेंद्रराजे यांना सांगणे आहे की त्यांनी स्थानिकांना हे विचारावे, त्यांना तरी हे पटत आहे का? असा प्रश्न पवारांनी केला आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, एखाद्या विषयासाठी, सामान्यांना न्याय देण्यासाठी जर तुम्ही संघर्ष केला, आवाज उठवला तर सातारा काय, उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा राहील. पण अशा पद्धतीने दमदाटी करून सोसायट्याचा ठराव घेणार असाल तर हे मलाच काय महाराष्ट्रालाही पटणारे नही. आपल्याविषयी आदर आहे, पण… रोहित पवार म्हणाले, आपल्याविषयी आदर आहे, पण सत्य सांगणे देखील गरजेचे आहे. आपला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि आपला मनमोकळा स्वभाव देखील नेहमीच आवडतो परंतु जावळी भागात सद्यस्थितीला जे चाललेय ते कदापि योग्य नाही. सोसायट्याच्या ठरावासाठी बाहेरून गुंड बोलवून स्थानिकांवर दहशत निर्माण करणे हे अंत्यंत खेदजनक आहे. छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपण विसरु नये आपण भाजपमध्ये असलात, वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपण विसरु नये. आपण योग्य माणसासाठी आदेश दिलात तर एकच काय जावळीतील शेकडो गावे ठराव देतील, पण अशाप्रकारची दहशत जनतेला आवडणारी नाही. यासंदर्भात आपण गांभीर्याने विचार कराल, ही अपेक्षा वजा विंनती, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *